धानाला १००० रूपये बोनससह मागण्या पूर्ण करा;जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राकाँचे धरणे आंदोलन

0
36

गोंदिया :धानपिकाला प्रोत्साहनपर १००० रूपये बोनस देण्यात यावे, अतिवृष्टी असो की वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला त्वरित देण्यात यावा, याशिवाय निराधारांना अर्थसहाय्य, महागाई तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यात यावे, या मागणीला घेवून राष्ट्रवादी काँग्रेसतर्पेâ आज (ता.१०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास गावस्तरापासून आंदोलन उभे करू, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राज्य सरकारला देण्यात आले.
महाराष्ट्रातील वेदांता ग्रुपचा उद्योग गुजरातच्या घश्यात घालण्यात आला. तो उद्योग परत महाराष्ट्रात आणण्यात यावा, शेतकर्‍यांना बोनस प्रतिक्विंटल १००० रूपये देण्यात यावे, धानखरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी त्वरित सुरू करण्यात यावी, नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकरी खातेदारांना त्वरित ५० हजार रूपये देण्यात यावे, संजय गांधी निराधार, श्रावणबाळसह इतर अर्थसहाय्य योजनांचे अनुदान त्वरित देण्यात यावे, विज बिलाचे मीटर रिडींगनुसारच बिल देण्यात यावे, जमिनीचे पट्टे त्वरित देण्यात यावे, ज्या शेतकर्‍यांना पट्टे मिळाले आहेत. त्या शेतकर्‍यांचा सातबारावर पिक नोंदणी करण्यात यावी, हिंसक वन्यप्राणीमुळे जिवीतहानी झाली. त्या पिडीताच्या कुटूंबाला मदत देण्यात यावी तसेच अतिवृष्टी व वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानीचा तातडीने मोबदला देण्यात यावा, अतिवृष्टीमुळे घर व गोठ्यांचा नुकसानीचा त्वरित मोबदला देण्यात यावा, बेघर झालेल्या कुटूंबाना त्वरित घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा, आधारभूत किंमत योजनेतंर्गत खरेदी होणार्‍या धानाला प्रोत्साहन राशि आघाडी सरकारने जाहिर केली होती. ती देण्यात यावी, आधारभूत केंद्रात प्रति एकरी २० क्विंटल धानखरेदीची मर्यादा वाढवून देण्यात यावी, इंधनाचे दर नियंत्रणात आणावे, किटकनाशक, रसायनिक खत, बियाणेचे दर नियंत्रणात आणावे, जि.प.शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी, आगामी काळात मुदत संपणार्‍या ग्राम पंचायतीच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्या, तांदूळ वर लावलेले निर्यात कर त्वरित मागे घेण्यात यावे, खंडा, कणकीवरील निर्यातबंदी उठविण्यात यावी, आदि मागण्यांना घेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (ता.१०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन माजी आमदार राजेंद्र जैन, आ.मनोहर चंद्रिकापुरे, आ.राजु कारेमोरे, जिल्हाध्यक्ष परशुरामकर, अ‍ॅड.विरेंद्र जायस्वाल तसेच सर्व आघाड्यांच्या पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
आदोलन सभेला सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, देवेंद्रनाथ चौबे, विनोद हरिनखेड़े, रमेश ताराम, वीरेंद्र जैस्वाल, राजलक्ष्मी तुरकर, यशवंत गणवीर, पूजा अखिलेश सेठ, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, मोहन पटले, अशोक शहारे, केतन तुरकर, अजय उमाटे, सी. के. बिसेन, लोकपाल गहाणे, डॉ अविनाश काशीवार, केवल बघेले, सुरेश हर्षे, जगदीश बावनथडे, किरण पारधी, नेहा तुरकर, सुधा रहांगडाले, अश्विनी पटले, रिता लांजेवार, योगेंद्र भगत, रविकांत बोपचे, प्रेमकुमार राहगडाले, कमलबापू बहेकार, मनोज डोंगरे, प्रभाकर दोनोडे, किशोर तरोणे, रफिक खान, कल्पना बहेकार, रजनी गिऱ्हेपुंजे, गणेश बरडे, कैलास पटले, अखिलेश सेठ, तेजराम मडावी, नीरज उपवंशी, सुनील पटले आदी पुढाऱ्यांनी संबोधीत केले.
आंदोलन सभेत राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधी धोरणांचा पुढार्‍यांनी निषेध नोंदविला. त्याचप्रमाणे दौर्‍यानिमित्त जिल्ह्यात दाखल झालेले पालकमंत्री मुनगंटीवार यांनी आंदोलन मंडपाला भेट देवून निवेदन स्विकारावे, अशी विनंती करण्यात आली. मात्र पालकमंत्र्यांनी आंदोलन स्थळाला पाठ दाखविली. उपरोक्त मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारला देण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक तसेच हजारो च्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
……….
*अन्यथा गावस्तरापासून आंदोलन उभे करू – माजी आमदार राजेंद्र जैन*
आघाडी सरकारच्या काळात भाजपचे पदाधिकारी १००० रूपये बोनसची मागणी करीत होते. आज त्याच मागणी बरोबर जनविरोधी धोरणांना घेवून राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करीत आहे. मात्र शेतकर्‍यांच्या हित जोपासण्याचा देखावा करणार्‍या सरकारच्या प्रतिनिधीने या मंडपाला भेट देण्याचे औदार्य दाखविले नाही. ही एक शोकांतिका आहे. किंबहुना यावरूनच भाजप शेतकरी हितेशी आहे की नाही, हे देखील सिध्द होत आहे. आज ज्या मागण्यांना घेवून राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करीत आहे. त्या मागण्या राज्य सरकारने पुर्ण करावे, अन्यथा खा.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात गावस्तरावरून याहून अधिक तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिला.
……….
*बोलायचे अन पडायचे नाही हेच भाजप प्रणीत सरकारचे धोरण – आमदार मनोहर चंद्रिकापुरे*
सत्ते नाहीत तर नको त्या मागण्या करणे आणि त्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाची दिशाभूल करणे,मात्र सत्ते आले तर जनतेला दिलेल्या अश्वसन देखील पडायचे नाही या भूमिकेचे परिचय भाजप सरकार आज देत आहे. शेतकऱ्यांना बोनस देण्याचे काम आघाडी सरकार ने केले आहे. ५०० आणि त्याहून अधिक ७०० रुपये आघाडी सरकारांनी दिले आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा शेतकरी व सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला तेव्हा तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंबीर पणे उभी राहिली आहे त्यातूनच हे आंदोलन उभे झाले आहे. शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यात आले नाही तर याहून तीव्र आंदोलन करेल. अशा इशारा आंदोलनाच्या माध्यमातून आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिला आहे.
……….
*धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय हवा -आमदार राजुभाऊ कारेमोरे*
शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम भाजप प्रणित सरकार करीत आहे. गेल्या तीन महिन्यात काय केले हेच कळेनासे झाले आहे अध्यापर्यंत ५० हजाराची मदत नियमित कर्ज दारांना करण्यात आली. जे आघाडी सरकारने निर्णय घेतले होते त्याच निर्णयाला पुढे नेण्याचे काम हि सरकार करीत आहे. मात्र त्यातही १७ भानगडी निर्माण करून वेळकाढू धोरण काम अवलंबित आहे. शेतकऱ्यांना जो पर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही असे मत आमदार राजाभाऊ कारेमोरे यांनी व्यक्त केले .