धानाला आम्ही बोनस देणारच-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
141
गोंदिया- पुर्व विदर्भातील धानउत्पादक शेतकर्याना बोनस मिळावा यासाठी आम्ही सुरवातीपासूनच आग्रही राहिलो आहोत,आणि आजही आहोत.परंतु तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकर्र्यांना बोनस देणार नसल्याचे जाहिर केले होते.बोनसएैवजी धान उत्पादित करणार्या शेतकर्याना मदत करु असे सांगितले होते.मात्र त्यांनी मदतही दिली नाही.आज त्यांच्याच पक्षाचे लोक आंदोलन करतायेहत हे आश्चर्य आहे.महाविकास आघाडीने जरी बोनस दिले नसले तरी आमचे सरकार बोनस देण्याच्या बाजूने असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही होकार दिल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.तर परराज्यातून आलेल्या हत्तीमुळे जे पिकांचे नुकसान होत आहे.त्याकरीता मोबदला देण्याचे धोरण सरकारने आकले आहे.त्यानुसार पिकाचे सर्वेक्षण करुन मोबदला देण्यात येणार आहे.तर वन्यजिवाच्या हल्य्ात ठार झालेल्यांच्या कुटुबियांना सर्वाधिक मदत करणारे राज्य आपले असून यावेळी तेंदुपत्ता कामगारांना 71 कोटीच्यावर बोनसची रक्कम मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोबतच गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व्हीजन तयार करण्यात आले असून पहिल्या पाच मुद्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.यामध्ये आरोग्याच्या सोयी सुविधा मजबूत करण्याला प्रथम प्राधान्य असल्याचे सांगितले.त्यानंतर कृषी,शिक्षण सिंचन व रोजगार या बाबींना महत्व देणार असल्याचे सांगितले.जिल्ह्याच्या विकासासाठी पक्षीय सत्तेला बाजूला सारून जिल्ह्यातील सर्व आमदारांना सोबत घेऊन आपण विकासाचा रथ पुढे नेणार असल्याचे सांगितले.तर नागझिरा व्याघ्रप्रकल्पात ताडोबा येथून 5 वाघीण आणण्यास मंजुरी मिळाली आहे,यावर बोलतांना आपल्याला वन व वन्यजिव विभागाच्यावतीने आजच्या सादरीकरणात अशी माहितीच दिली नसल्याची कबुली देत आपणास याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले.जिल्ह्यातील धान खरेदीमध्ये होत असलेल्या गोंधळावर लवकरच नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


जिल्हा निसर्गसंपदेने नटलेला असून जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी काय करता येऊ शकते यासाठी आपण सर्वांनी एक व्हिजन पुस्तिका तयार करुन द्यावी त्यानुसार नक्कीच पर्यटन विकास करुन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नियोजन करण्यात येईल असे पर्यटनाच्या मुद्यावरील प्रश्नावर बोलतांना सांगितले.