देवरी येथे ‘बिग बटरफ्लाय मंथ’ उत्साहात

0
39

देवरी परिसर फुलपाखरांच्या जैवविविधता विपुलतेने संपन्न

देवरी,दि.11- स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील प्राणिशात्र विभाग, जुलॉजीकल सोसायटी व अरण्ययात्री वाइल्डलाईफ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बिग बटरफ्लाय मंथ’ हा उपक्रम नुकताच देवरी येथे उत्साहात पार पडला.

समोरोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवरीच्या मनोहरभाई पटेल महाविद्यालयाचे प्रा.डॉ. अरुण झिंगरे हे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुधीर भांडारकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.  या उपक्रमात 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फुलपाखरांच्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. तसेच फुलपाखरांच्या प्रजातींचे छायाचित्र स्पर्धेत 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

समारोपीय कार्यक्रमात या दोन्ही स्पर्धेतून निवडक प्रत्येकी पाच सर्वोत्कृष्ट स्पर्धकांना पारितोषिकासह प्रशस्तिपत्र देण्यात आले.  या सर्व चित्रांची प्रदर्शनी महाविद्यालयात आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे आयोजक व प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. सुधीर भांडारकर यांनी ‘एबीसि ऑफ बटरफ्लाय’ या सेमिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्याना फुलपाखरांच्या संरक्षण, संवर्धन व संशोधन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच ’30 मिनिट्स बटरफ्लाय काउन्ट’ या फुलपाखरांच्या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांनी स्थानिक धुकेश्वरी मंदिर परिसरात वेगवेळ्या 21 फुलपाखरांची नोंद केली. यावेळी प्राचार्य डॉ. अरुण झिंगरे यांनी देखील विद्यार्थाना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सचिन चौरसिया, डॉ. त्रिमूर्ती लांबट, प्रा. आशिष गडवे आणि प्रा. उमेश चव्हाण यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे राष्ट्रीय संयोजक व भारतातील फुलपाखरांचे अग्रगण्य शास्त्रज्ञ प्रो. कृष्णमेघ कुंटे, बंगलोर व विदर्भ संघटक डॉ. आशिष टिपले यांनी या उपक्रमाची प्रसंशा केली.