34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ रानडूकरांमुळे होणाऱ्या नुकसानीची उपाययोजना करा – आ.विजयभाऊ रहांगडाले

रानडूकरांमुळे होणाऱ्या नुकसानीची उपाययोजना करा – आ.विजयभाऊ रहांगडाले

0
30

blank

जिल्हा वार्षिक निधीमध्ये मागणी.

तिरोडा:-राज्याचे वने व सांस्क्रुतिक मंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा वार्षिक योजनेची आढावा सभा घेण्यात आली. या सभेमध्ये विधानसभा सदस्य हे सदस्य असून विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी यांना प्रश्न उपस्थित करून  तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रानडुकरांच्या हौदोशामुळे शेतकरी त्रस्त असून ऐन धानपिक कापणीच्या वेळी मोठया प्रमाणात धानाचे नुकसान होत आहे. तसेच शेतकऱ्यांनी धानपिकाचे साठवण करून दिल्यानंतरही नुकसान करित असतात रानडुकरांच्या हौदसामुळे बांधावर तूरपिक लावण्याचे प्रमाण कमी झाले असून याची उपाययोजना करणे अति गरजेचे आहे. जिल्ह्यातील शेतकरी रानडूकरांमुळे त्रस्त झाला असून वारंवार वन विभागाकडे तसेच लोकप्रतीनिधीकडे यावर उपाययोजना करण्याबाबत शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. सदर प्रश्न गांभीर्याने घेवून उपाययोजना करण्याबाबत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार  विजय विजयभाऊ रहांगडाले यांनी वनमंत्री तसेच पालकमंत्री  सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे मागणी केली. तसेच नागरी व ग्रामीण क्षेत्रात कित्येक वर्षापासून वस्ती करून राहणाऱ्या लोकांची पक्के घरे आहेत तसेच शासकीय कार्यालय आहेत अशा जागेवर वनविभागार्फ झुडपी जंगल नोंद असल्यामुळे त्यांना हक्क बजावता येत नाही. शासकीय कार्यालयात विकास कामे मंजूर करण्यामध्ये अडचणी उदभवत असतात तेव्हा अशा कायमस्वरूपी वस्ती करणारे तसेच शासकीय कार्यालयातील जागेवरील झुडपी नोंद कमी करण्याबाबतची मागणी  केली आहे.

blank