आदिवासी समाजातील मुलांनी आरक्षणाचा लाभ घेवून आपले भविष्य घडवावे

0
19

आमदार सहसराम कोरोटे यांचे प्रतिपादन.
देवरी,ता.११: राज्य शासनाच्या ९ हजार कोटीच्या बजेटपैकी २ कोटीचा निधी हा शिक्षणावर खर्च होतो. आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी एकलव्य माँडेल पब्लिक स्कुल येथे इंग्रजी मिडीयमच्या शिक्षणाची सोय आहे. त्यामुळे प्रत्येक मुलांनी जिद्दीने अभ्यास करून आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. आज मिळणा-या आरक्षणाचे आपल्या जीवनात सोने केले नाही तर उद्या काय अवस्था होईल हे सांगता येत नाही. यासाठी आदिवासी समाजातील मुलांनी आरक्षणाचा लाभ घेऊन आपले भविष्य घडवावे, असे आवाहन आमदार सहसराम कोरोटे यांनी बोरगाव बाजार येथे केले.

आमदार कोरोटे हे देवरी तालुक्यातील बोरगावं/बाजार येथील एकलव्य माँडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुल परिसरात मंगळवारी रोजी क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान, नागपूर यांच्या वतीने पोषण महिना अंतर्गत मंगळवार रोजी आयुर्वेदीक झाडाचे व फळांचे झाडांचे वृक्षारोपण कार्यक्रमात उद्घाटक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांनी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार हे होते. या प्रसंगी आयुर्वेद संस्थान नागपूरचे अनुसंधान अधिकारी डॉ. वनमाला वाकोडे, बोरगाव/बाजारचे सरपंच कल्पनाताई देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शितल जाळे, उपाध्यक्ष नामदेव आचले, देवरीचे नगरसेवक मोहन डोंगरे, शासकिय कन्या आश्रमशाळा बोरगाव/बाजारचे प्राचार्य एन.एल.भाकरे, ग्रा.पं.सदस्य कैलाश देशमुख, पुनाराम तुलावी, एकलव्य पब्लिक सकुल चे प्राचार्य चारूलता सहारे, अधिक्षक डी.ए.लिंबोरे, अधिक्षिका एस.एस शेबे यांच्यासह दोन्ही आश्रमशाळे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्राचार्य चारूलता सहारे यांनी तर संचालन विजयकुमार गोरे यांनी आणी उपस्थितांचे आभार विवेक पाटिल यांनी मानले