ओबीसी – सर्वसमाजाची बोधप्रद कोजागिरी

0
10

गोंदिया – युवा बहुजन मंच गोंदिया जिल्हा तर्फे “ओबीसी व सर्व समाजाची बोधप्रद कोजागिरी” कार्यक्रम महात्मा गांधी मंगल कार्यालय गोविंदपूर रोड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम जिजाऊ, सावित्रीमाई – महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. बबलू कटरे (अध्यक्ष-ओबीसी संघर्ष कृति समिति), डॉ. दिशा गेडाम  राजेश डहाट, यांनी विद्यार्थी पालकांना शैक्षणिक, महिला सक्षमीकरण, ओबीसी वर्गाची उन्नती, ओबीसी जनगणना व मंडल आयोग आणि सध्याच्या ज्वलंत समस्यांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेम जैस्वाल होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील भोंगाडे (अध्यक्ष युवा बहुजन मंच), रवी भांडारकर (उपाध्यक्ष), खेमेंद्र कटरे,  अमित धावडे, राधेश्याम करंजेकर, रामलाल गहाणे, सावन डोये, रिना सुनील भोंगाडे, माधुरी कैलास भेलावे , आशा रवी भांडारकर , रुपाली सतीश रोटकर , ज्योती जुगनू कापसे , जयश्री धनराज पुरी , शुभांगी पुरनलाल पाथोडे , भूमिका जितेश राणे , कुंदा छोटू पंचबुधे , डिंपल तीर्थराज उके , शिला शरद इटनकर , सिंधू महेंद्र मोटघरे , शालू अनिल बड़वाईक, माया राजा भेलावे,पौर्णिमा नागदेवे आदि प्रामुख्याने उपस्थित होते. तळागाळात जाऊन विद्यार्थी महिलांच्या उत्थानाकरीता धड़पडत असलेल्या, समाज जागृती करत असल्याबद्दल प्रा.डॉ.दिशा गेडाम यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन अतुल सतदेवे यांनी केले तर आभार एस यू वंजारी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमल हटवार, संजू पटले, सोनू भांजा, संजू रहांगडाले, संजू भांडारकर, सतीश गिरी, राजू नेवारे, राहुल खोब्रागडे, घोलू सोनवणे, छोटू पारधी, ललित बावनकर, सुशील ठवरे, युवा बहुजन मंच, ओबीसी संघर्ष कृती समिती, सर्वसमाज विचार महोत्सव समिती आदी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले, कार्यक्रमाच्या शेवटी खीर प्रसादाचे वाटप करण्यात आले.