गडचिरोली-अनेक प्रकारची आव्हाणे येतील भौगोलिक परिस्थिती यांचा विचार करून जिल्ह्यात असलेल्या मुबलक वनोपचार तसेच धान उत्पादनावर आधारीत उद्योग उभे करण्यासाठी गुंतवणुकदारांना आवश्यक पोषक वातावरण गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले.
जिल्हा औद्योगिक केंद्र गडचिरोली यांच्या मार्फत गडचिरोली येथे जिल्ह्यातील आजुबाजुच्या गुंतवणुकदारासाठी गुंतवणूक पोत्साहन, निर्यात, व्यवसातील सुलभता व एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर एक दिवसीय जिल्हास्तरीय परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलत होते. जिल्हाधिकारी मीणा पुढे म्हणाले, जिल्ह्यातील पैसा जिल्ह्यातच फिरत आहे, बाहेरून जिल्ह्यात गुंतवणक झाल्यास जिल्ह्याचे एत्पन्न वाढेल. जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात धानाची शेती करून उत्पादन घेतल्या जाते. जिल्ह्यात धानोबरोबर ८४ वेगवेगळी उत्पादने आहेत. यावरील उद्योग मोठय़ा प्रमाणात जिल्ह्यातच उभे राहू शकतात. गडचिरोली जिल्ह्यातील तीन औद्योगिक क्षत्र आहेत. या ठिकाणी गुंतवणुकदारांना येण्यासाठी प्रशासनासह व इतर क्षेत्रातील व्यक्तींनी सहकार्य करून पोषक वातावरण देणे आवश्यक आहे.
परिषदेत उपवनसंरक्षक मिलेश शर्मा, मैत्री कक्ष मुंबईचे नोडल अधिकारी डी. जी. महाजन, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, सीए अतुल हुरकत, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक युवराज टेंभुर्णे, जिल्हा अधीक्षक कृक्षी अधिकारी बसवराज मास्तोळी व गुंतवणूकदार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्वप्नील राठोड यांनी जिल्ह्यातील गुंतवणूक व संधी याबाबत प्रास्तावनेत माहिती उपस्थितांना दिली. तसेच निलेश शर्मा यांनी वन विभाग व त्याअंतर्गत असणार्या विविध वनोपजांवरील उत्पादन क्षमता व सद्यस्थितीबाबतची माहिती सादर केली. गडचिरोली जिल्ह्यातील एक जिल्हा एक उत्पादनासाठी धान या उत्पादनाची निवड करण्यात आली. प्रमुख उत्पादन असलेल्या धानाची निर्यात कशी प्रत्यक्ष करता येईल, यासाठीही या परिषदेत विचारमंथन करण्यात आले. अतुल हुरकत यांनी निर्यातवृद्धी यावर माहिती दिली. सिडबी नागपूर येथील श्री. मोरे व श्रीमती प्रियांका यांनी सिडबी कर्ज योजनांची माहिती दिली. युवराज टेंभुर्णे गजानन मद्यासवार यांनी बॅंक योजना सांगितल्या.