भौतिक शास्त्र विभागाची इनोव्हेशन केंद्राला भेट

0
15

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थेव्दारा संचालीत धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने डॉ.डी.पी.खंडेलवाल जन्मशताब्दी वर्ष साजरा केला जात आहे. यानिमित्त भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने जयपूर (राजस्थान) येथील इनोव्हेशन केंद्राला आभासी भेट देण्यात आली.
स्थानिक धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयात भौतीकशस्त्र विभागाच्या वतीने डॉ.डी.पी. खंडेलवाल जन्मशताब्दी वर्ष साजरा केला जात आहे. कार्यक्रमात प्राचार्य डॉ.अंजन नायडु, डॉ.आभा खंडेलवाल, डॉ.सुशील पालीवाल, डॉ.दिलीप चौधरी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.नायडु यांनी विज्ञानाचे समाज हितात योगदान याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच शिक्षणात तंत्रज्ञानाचे महत्व पटवून दिले. मुख्य अतिथी डॉ.आभा खंडेलवाल यांनी प्रो.डी.पी. खंडेलवाल यांच्या कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. प्रा.पी.के. अहलुवालिया, प्रा.वाय.के.विजय हे ऑनलाईन पध्दतीने कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी भौतिक शास्त्राच्या सिध्दात समजून घेण्यासाठी अनेक उदाहरण सांगितले. दरम्यान आभासी पध्दतीने जयपूर (राजस्थान) येथील इनोव्हेशन केंद्राला भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.आनंद मोरे, तकनिकी सहायक डॉ.आशिष साहारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.प्रिती नागपुरे, प्रा. वाय.एस.बोपचे यांनी परिश्रम घेतले.