शाळेच्या रस्त्यावर अतिक्रमण;आसोली येथील प्रकार

0
65

अतिक्रमण हटविण्याची मागणी

गोंदिया(ता.14) -शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्याजण्याच्या रस्त्यावर गावातील व्यक्तींनी अतिक्रमण केल्याने शाळेत येण्याजण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर धक्कादायक प्रकार तालुक्यातील आसोली येथे उघडकीस आला असून सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते मुकेश बन्सोड यांनी प्रशासनाकडे केली आहे.
येथे प्रसिद्ध श्री सुदामा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसे मुक्त जीवन कॉन्व्हेंट असून येथे परिसरातील नवरगाव(कला),मुंडीपार(खुर्द),इर्री, मोरवाही, बटाना,नवरगाव(खुर्द),चुलोद व आसोली येथील विध्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांच्या शाळेत येण्याजण्याच्या रस्त्यावरच गावातील व्यक्तींनी अतिक्रमण केल्याने रस्ता अपुरा झाला आहे. तसेच पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने पाण्यातूनच शालेय विद्यार्थ्यांना वाट काढावी लागत असते. या संबधात गावकऱ्यांनी अनेकदा सदर अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायत ला कळविले परंतु ग्राम पंचायत प्रशासन यावर कोणतीही कारवाही करीत नाहीत त्यामुळे सदर अतिक्रमण धारकासोबत ग्रामपंचायत प्रशासनाचे काही आर्थिक हितसंबंध तर नाही?असा आरोपही गावकऱ्यांनी लावला आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता सदर अतिक्रमण तात्काळ हटवून विद्यार्थ्यांसाठी रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते मुकेश बन्सोड यांनी केली आहे.

सदर गट हा शासकीय असुन या गटावर गावातील अनेकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनातर्फे प्रक्रिया सुरू आहे.-श्री बिसेन ग्रामविकास अधिकारी ग्रा. प. आसोली