फटाका परवाना नूतनीकरण अधिकार आता एसडीओला

0
23

गोंदिया,दि.14 विस्फोटक नियम 2008 च्या तरतुदीनुसार नविन फटाका परवाना देणे, तात्पुरता फटाका परवाना देणे, फटाका परवान्याचे नुतनीकरण करणे व फटाका परवाना धारकाचे नाव बदल करण्याचे अधिकार जिल्हादंडाधिकारी यांना आहेत. जिल्हाधिकारी नयना यांनी उपरोक्त विषयाचे अधिकार सर्व उपविभागीय अधिकारी यांना एका आदेशान्वये प्रदान केले आहेत. दिवाळी सणाच्या निमित्ताने फटाका विक्रेता व नागरिकांना अडचण होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.

          फटाका परवान्याचे नुतनीकरण करण्याबाबत चे संदर्भातील संपूर्ण अधिकार विस्फोटक नियम 2008 चे कलम 112 अन्वये गोंदिया जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रा करीता 14 जानेवारी, 2016 अन्वये प्रदान करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे विस्फोटक नियम 2008 चे कलम 84 तात्पुरता फटाका परवाना संदर्भातील मला प्राप्त संपूर्ण अधिकार गोंदिया जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रा करीता या आदेशान्वये प्रदान करण्यात येत आहे.