फेडरेशननंतर आदिवासी महामंडळाच्या संस्थेत अपहार

0
42

सालेकसा-तालुक्यातील समृद्ध किसान शेती उद्योग साधन सामग्री पुरवठा व खरेदी विक्री सेवा सहकारी संस्था र्मयादीत सालेकसा या संस्थेचा घबाळ १४ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला. तर दुसरीकडे १५ ऑक्टोबर रोजी पुन्हा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गर्ोे येथील १ कोटी ६७ लाख १0 हजार १३१.८0 रुपये तसेच नवीन बारदाना किंमत १0 लाख २७ हजार ८६0 रुपये असा एकूण १ कोटी ७७ लाख ३७ हजार ९३८ घबाळ उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सलग २ दिवसात सुमारे ३ कोटी ३३ लाख रुपयाचा अपहार झाल्याने शेतकरी उपासी व व्यापारी तुपासी असे म्हण्याची वेळ आली आहे.
सविस्तर असे की, गर्ोे येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नोंदणी क्र. १0४५ च्या संचालक मंडळाने शासनाच्या वेळोवेळी निर्गमीत करण्यात येणार्‍या नियम व अटीच्या अधिन राहून धान खरेदी करायची होती. पणन हंगाम २0२१-२२ मध्ये या संस्थेने शेतकर्‍यांचे धान खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक करण्याची पूर्ण जबाबदारी येते. खरेदी केलेला धान आदिवासी महामंडळाच्या निदेर्शा प्रमाणे भरडाईसाठी देणे आवश्यक होते. मात्र त्या धानाची विल्लेवाट लावण्यात आली. या संदर्भात आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला वेळोवेळी धान उचल देण्याकरीता नोटीस देण्यात आल्या. मात्र, संस्थेकडून नोटीसचे उत्तर देण्यात आले नाही व धान उचलही देण्यात आलेले नाही. यामुळे संस्थेच्या गोदामांमध्ये धान साठ्याची पाहणी करण्याकरीता २ ऑक्टोबर आदिवासी विकास मंहामंडळाचे पथक गोदामात दाखल झाले.
गोदामातून तब्बल ८६१३.४७ क्विंटल धान तर नवीन बारदाना २५,६३४ नग बारदाना आढळून आला नाही. या दोघांची किंमत १ कोटी ७७ लाख ३७ हजार ९३८ रुपयाचा अपहार झाल्याने आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी सामर भागवत यांच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि शिंदे करीत आहेत.