पोलिसांचे अँप दुर्गम भागातील नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यास झाले सोपे

0
23

गडचिरोली,दि.17ः-  पोलिस दलाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या सुविधा अधिक लोकाभिमूख करण्यासाठी पोलिसांनी विशेष अँप विकसित केले आहे. या अँपमुळे दुर्गम भागातील नागरिकांना बॅंक सेवा, जात प्रमाणपत्र, पीक विमा, पंतप्रधान विमा योजना, ई-र्शम कार्ड, पेंशन सव्र्हीस, इन्शुरन्स या सारख्यात सुविधांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे.
पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली दुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलिस दादालोरा खिडकीअंतर्गत काम करणार्‍या युवक-युवती आणि पोलिस अंमलदारांसाठी एक दिवशीय कार्यशाळा शनिवारी पोलिस मुख्यालयात पार पडली. या कार्यशाळेत १२0 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. त्यांना अँपबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या युवक-युवतींचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आली. कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक अहेरी अनुज तारे, डिस्ट्रीक्ट मॅनेजर आकाश खोडवे, विशाल कुंभाळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, उपनिरीक्षक धनंजय पाटील व सर्व पोलिस अंमलदारांनी परिश्रम घेतले.

३५५४ युवक-युवतींना स्वयंरोजगार
कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा)सोनापूर गडचिरोली आणि बीओआय आरसेटी गडचिरोली यांच्यामार्फत ब्युटीपार्लर १४0, मत्स्यपालन ८६, कुक्कुटपालन ५0४, बदक पालन १00, वराहपालन १0, शेळीपालन ८0, शिवणकला २२२ख् मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ६५, भाजीपाला लागवड ५२५, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण ८८0, टू-व्हिलर दुरुस्ती ६४, फास्ट फुड ६५, पापड लोणचे ३0, टू/फोर व्हिलर प्रशिक्षण ५0२, एमएससीआयटी २00, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकूण ३५५४ युवक-युवतींना स्वयंरोजगाराचा मार्गदर्श दाखविण्यात आला.

२८६६ युवक-युवती आत्मनिर्भर
आतापर्यंत गडचिरोली पोलिस प्रशासनाकडून रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक ५१२, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी ३१४, ऑटोमोबाईल २७६, इलेक्ट्रीशिअन १६७, प्लंम्बींग ३५, वेल्डींग ३८, जनरल ड्युटी असिस्टंट ३१४, फिल्ड ऑफीसर ११ व व्हीएलई ५२, सेल्समॅन ४ असे एकूण २८६६ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.