
जाणून घ्या इतर 22 अधिकाऱ्यांच्या बदल्या कोठून कोठे झाल्या
गोंदिया,दि.20ः– गोंदिया जिल्ह्यात कायदा व्यवस्थेच्या बाबतीत ठपका ठेवण्यात आलेले आणि प्रसारमाध्यमांना जिल्ह्यात या वर्षात झालेल्या 3-4 हत्याकांडासंदर्भातील तपासाची माहिती न देणारे महाविकास आघाडीच्या काळात आणले गेलेले पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांची अखेर गोंदियातून उचलबांगडी झाली आहे.त्यांच्या जागेवर लातूरचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांची पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.विशेष म्हणजे पानसरे यांना राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने नियुक्तीविना ठेवले आहे. गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांची पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक बदली झाली आहे.मुंबईच्या पोलीस उपआयुक्त निलोत्पल यांची गडचिरोली पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने गुरूवारी रात्री पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Maharashtra IPS Officer Transfer) आदेश पारित केले आहेत. यापूर्वी गोयल हे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. दरम्यान, डॉ. अभिनव देशमुख (Dr. Abhinav Deshmukh) यांच्या बदलीचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे कार्यरत असलेल्या शिरीष सरदेशपांडे यांची सोलापूर ग्रामीण येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर पोलीस अधीकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या कंसात कोठून कोठे
1. धनंजय आर कुलकर्णी (पदस्थापनेच्या पतिक्षेत ते पोलीस अधीक्षक रत्नागिरी – SP Ratnagiri)
3. बसवराज तेली (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर DCP, Nagpur City ते पोलीस अधीक्षक, सांगली- SP Sangli)
4. शेख समीर अस्लम (अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली Addl SP Gadchiroli ते पोलीस अधीक्षक, सातारा – SP Satara )
5. अंकित गोयल (पोलीस अधीक्षक, गडचिरोली SP Gadchiroli ते पोलीस अधीक्षक पुणे (ग्रामीण- SP Pune (Rural)
7. राकेश ओला (पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर SP ACB Nagpur ते पोलीस अधीक्षक अहमदनगर – SP Ahmednagar)
8. एम. राजकुमार (पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर SP Lohmarg, Nagpur ते पोलीस अधीक्षक, जळगाव- SP Jalgaon)
9. रागासुधा आर. (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.3, जालना ते पोलीस अधीक्षक परभणी- SP Parbhani)
10. संदीप सिंह गिल (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र. 12 हिंगोली ते पोलीस अधीक्षक हिंगोली – SP Hingoli)
11. श्रीकृष्ण कोकाटे (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई ते पोलीस अधीक्षक नांदेड)
14. गौरव सिंह (पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ते पोलीस अधीक्षक यवतमाळ)
15. संदीप घुगे (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.11 नवी मुंबई ते पोलीस अधीक्षक अकोला)
16. रविंद्रसिंग एस परदेशी (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते पोलीस अधीक्षक चंद्रपूर)
17. नरुल हसन (पोलीस उपायुक्त नागपूर शहर ते पोलीस अधीक्षक वर्धा)
18. निखिल पिंगळे (पोलीस अधीक्षक लातूर ते पोलीस अधीक्षक, गोंदिया)
19. निलोप्तल (पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई ते पोलीस अधीक्षक गडचिरोली)
20. संजय ए बारकुंड (पोलीस उपायुक्त, नाशिक शहर ते पोलीस अधीक्षक, धुळे)
21. श्रीकांत परोपकारी (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते पोलास उपायुक्त, ठाणे शहर)
22. सचिन अशोक पाटील (पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) ते पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद)
23. लक्ष्मीकांत पाटील (पोलीस उपायुक्त ठाणे शहर ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)
24. पराग शाम मणेरे (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते उपायुक्त, विशेष सुरक्षा विभाग (VIP Security)मुंबई)