गोठणगाव व धाबेपवनी जन आरोग्य समितीची आढावा बैठक संपन्न

0
26

अर्जुनी मोरगाव,दि.31ः- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र पवनी धाबे येथे जि.प.उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि.यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य केंद्राची आढावा बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.प्राथमिक आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधा व भौतिक सुविधा,औषध खरेदी, आरोग्य केंद्रात लागणारे अतिआवश्यक साहित्य खरेदी, उपलब्ध नसलेल्या औषधांची मागणी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीस पं.स.उपसभापती होमराज पुस्तोडे,पं.स.सदस्या आम्रपाली डोंगरवार,माजी जि.प.सदस्य रतिराम राणे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय राऊत, गोठणगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेंद्र खोब्रागडे, डॉ.सागर जांभुळकर,बोंडगावच्या सरपंचा पुष्पाताई डोंगरवार, उपसरपंच दिलीप तिरपुडे, पवनी धाबेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील, डॉ.मेंढे, समितीचे सदस्य संजय ईश्वार, विनोद किरसान, रविंद्र घरतकर,हर्षा राऊत,जयंत राऊत,अशोक सरकार, कृष्णा मांडवे,तुलशिदास कोडापे, रविंद्र नाईक,शिवलाल कोरेटी, भिमराव नंदेश्वर,कलिराम काटेंगे,जागेश्वर मते,ताराचंद ठवरे तथा दोन्हि आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.