महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गोंदिया जिल्हा दौरा

0
34

गोंदिया दि. 31, राज्याचे  महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 01 व 02 नोव्हेंबर 2022 रोजी गोंदिया जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.

 मंगळवार 01 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 04.00 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. सायंकाळी 05.00 वाजता कवाली मैदान, संजयनगर येथे नगरपालिकेच्या वतीने आयोजित स्थायी भूमी पट्टे वितरण कार्यक्रमास उपस्थिती. 06.00 वाजता श्रीकृष्ण गौरक्षण सभा संचलित गौशाळांना भेट. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह गोंदियाकडे प्रयाण व मुक्काम.

बुधवार 02 नोव्हेंबर रोजी सकाळी  11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयांवर आढावा बैठक. दुपारी 02.00 आसोली ता. गोंदिया येथे पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. 02.15 वाजता आसोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. सोयीनुसार मुंबईकडे प्रयाण.