9 नोव्हेंबरला गोंदियात अ.भा.दलित अधिकार आंदोलनाचे गोंदिया जिल्हा अधिवेशन

0
21

गोंदिया,-खिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे प्रथम जिल्हा प्रतिनिधी अधिवेशन बुधवार 9 नोव्हेंबर 22 ला कामगार भवन रामनगर गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे,यात आंदोलनाच्या समितीचे राष्ट्रीय ऊपाध्यक्ष कॉम्रेड महादेव खुड़े(नाशिक) व राज्य निमंत्रक कॉम्रेड शिवकुमार गनवीर (भंडारा) के प्रमुख्याने मार्गदर्शन करणार या अधिवेशनात जिल्हा शाखेची कार्यकारिणीचे गठन करण्यात येईल। दलित अधिकार आंदोलनाचे जिल्हा निमंत्रक मिलिंद गनविर यां कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करत सांगीतले आहे की एकी कड़े आपण स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित आहोत या अमृत कालीनह काड़ात उत्तर प्रदेशाच्या लखीमपुर(खिरी(येथे दोन दलित मुलींवर बलात्कार करूण हत्या करण्यात आली, राजस्थान मध्ये एका शालेत शिकणा-या मुलास त्यांनी स्वर्ण शिक्षकांच्या पाण्याचे माटास (घड़ा) स्पर्श केला म्हणुण शिक्षकाच्या मारहाणिस त्याची मृत्यु झाली एका आकड़ेवारी नुसार दर दहा मिनीटांनी आपल्या देशात दलित अत्याचाराची एक घटना घड़ते ,भाजप सत्तेत आल्या नंतर भाजप शासीत राज्यात अशा घटना मोठ्या प्रमाणावर होत आहेत हि विंडबना आहे की काही विरोधी सरकार असलेल्या राज्य यात मागे नाहीत.दलित आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे नोंदविण्यात मोठी दिरंगाई केली जाते.त्याशिवाय दलितांच्या सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्याचे योजना व उपायांवर कात्री लावण्यात येत आहे राज्य सरकारने दलित विकास सेवांचे खाजगीकरण करून आड़मार्गाने आरक्षण संपविल्या जात आहे, दलितांना भुमिवितरण, शिक्षण,रोजगार, निवास व आरोग्य आणि विकासाच्यां योजना एकतर बंद केल्या जात आहेत किंवा ठप्प केल्या जात आहेत. या प्रश्नांना घेवुणच वर्ण संघर्ष व वर्ग संघर्षाचे समन्वय साधुण देशपातड़ीवर प्रखर संघर्ष करणाऱ्यां एका राष्ट्रव्यापी संघटनेची अत्यंत गरज लक्षात घेवुन राष्ट्रीय स्तरावर “अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन “ह्या संघटनेची स्थापना होऊन या संघटनेचे राष्ट्रीय स्थापना स्थापना अधिवेशन नुकतेच औरंगाबाद (महाराष्ट्र)येथे घेण्यात आले याच पार्श्वभूमीवर 9 नोव्हेंबर ला गोंदियात होणा-या जिल्हा अधिवेशनात सर्व संबधित प्रतिनिधींना शामिल होण्याची विनंती मिलिंद गनविर, अशोक मेश्राम, करूणा गनविर, प्रल्हाद ऊके, चरणदास भावे, जितेंद्र गजभिए, वासुदेव ढोके, शंकर बिंझलेकर (संयोजन समिती) यांनी केली आहे