36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ श्रमदानातून इटियाडोह कालव्याच्या रस्त्यांची डागडुजी

श्रमदानातून इटियाडोह कालव्याच्या रस्त्यांची डागडुजी

0
37

blank

अर्जुनी मोरगाव,दि.05ः श्रमदान हे कधिच वाया जात नसतो या उक्तीप्रमाणे जि.प.उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि.यशवंत गणविर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगडचे माजी उपसरपंच तेजराम राऊत यांच्या नेतृत्वाखाली श्रमदानातून इटियाडोह कालव्याच्या रस्त्याची दुरुस्ती केली. जवळपास ६ किमी रस्ता यावर ३० ते ३५ ब्रास मुरूम माती येण्याजोगे नसणारा हा कालव्याचा रस्ता, रस्त्याची अवस्था उपाध्यक्ष महोदय व माजी उपसरपंच साहेबांना लक्षात आली.चर्चा खलबते करुन स्वतः पुढाकार घेऊन या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत माती मुरूम टाकून डागडुजी केली.
अशीच भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात आली अश्यक पण शक्य होते हे त्यांनी सिद्ध केले.यावेळी तेजराम मडावी,प्रमोद राऊत,तुलशिदास कोडापे,विजय ताराम,मधुकर राऊत,विकास भावे,सुरेश मळकाम उपस्थित होते.

blank