खा.प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने मुंडीपार ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम

0
32

गोंदिया –तालुक्यातील मुंडीपार येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारती चे बांधकाम खा.प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने जनसुविधा आणि 15 वा वित्त आयोग पंचायत स्तर निधी अंतर्गत करण्यात आले. तसेच खा. प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून मुंडीपार येथील स्मशानभूमी पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी 5 लाख रुपये व मातोश्री रस्ते बांधकाम अंतर्गत गोंदिया-तिरोडा मुख्य रस्त्यापासून हिवरा तलावापर्यंत रस्ता खडीकरण करीता 23 लाख रुपये असे एकूण 28 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यानिमित्त मुंडीपार ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित लोकार्पण व भूमिपूजन सोहळा माजी आमदार  राजेंद्र जैन यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सभापती मुनेश राहांगडाले व दिपाताई चंद्रिकापुरे, नीरज उपवंशी, डॉ वेदप्रकाश चौरागड़े, विद्याताई पटले, शैलजा सोनेवाने आदी मान्यवर प्रमूख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी माजी आमदार राजेन्द्र जैन मार्गदर्शन करतांना म्हणाले की आमचे नेते खा. प्रफुल पटेल हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही राजकीय भेदभाव न बाळगता सदैव कटिबद्ध आहेत श्री जैन पुढे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जी आश्वासने देण्यात आली ती पाळण्यात आली आहेत. धान खरेदी केंद्र सुरू झाली नसताना आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले तेंव्हा धान खरीदी सुरवात झाली आहे. यापुढे ही शेतकरीच्या समस्या व मागण्यांसाठी लढा उभारण्याची वेळ आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणार, अशी ग्वाही श्री जैन यांनी दिली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून मुंडीपार येथील नागरिकांनी विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खा.श्री प्रफुल पटेलजी व मा.आमदार राजेन्द्र जैन यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी सर्वश्री राजेन्द्र जैन, दिपाताई चंद्रिकापुरे, नीरज उपवंशी, मुनेश रहांगडाले, विद्याताई पटले, वेदप्रकाश चौरागड़े, शैलजा सोनेवाने, दिगंबर गौतम, आनंद सौस्कर, मायाताई बिजेवार, सुखसागर देशभ्रतार, कपिल नेवारे, रंजनताई मेंढे, नितिन टेंभरे, ऋषिमुनि मेंढे, डी. पी. सोनवाणे, हुयेंद्र कुमार बिजेवार, सुरेंद्र कुमार चचाने, फूलवंतताई बिजेवार, सुनीताताई डोंगरे, सविताताई टेंभरे, इच्छाताई जांभूलकर, धनेश्वरिताई ढेकवार, कारूभाऊ टेम्भरे, श्रीहरी बुलबुले, शिवचंद बिजेवार, दीपक लिल्लारे, जीवन बोपचे, तेजुभाऊ कोहड़े, महेंद्र बिजेवार, प्रेमलाल गौतम, कुंजिलाल बावने, डॉ.संदीप तुरकर, मनोज बिजेवार, मन्नु मंडिये, प्रवीण बिजेवार, छोटूभाऊ मौदेकर, रवि खोटेले, उमराव मौदेकर, उत्तम मेंढे, मुकेशजी तवाड़े, विनोद बिजेवार, गनवीर सर , राहंगडाले सर, नरेंद्र गनवीर, अजय डोंगरे, पदम चौरिवार, दुलीचंद चौरिवार, कटरेजी, लकी बिजेवार, गौरव बिजेवार, नरेंद्र बिजेवार, मुन्नाभाऊ रानगिरे, शमलाल सौंस्कार, खेमसिंह भाटी, भीमराजजी गौतम, उमेश चेचाने, जीतूभाऊ जाम्भूलकर, संकेत किरनापूरे, अनुज मेंढे, रोहित राहंगडाले, संजू चेचाने, अलकेश बिनजाड़े, सचिन मेंढे, अनिलजी राहंगडाले, शहारे मैडम, प्रणीताताई देशभरतार, अंकमालाताई लांजेवार, डॉ.ठाकुर मॅडम, ऊके मॅडम, मंडिये ताई, सौंस्कारताई, कोहड़ेताई, डोंगरे ताई, टेम्भरे ताई सहीत ग्रामस्त उपस्थित होते.