पोलीस विभागातर्फे मॅरेथॉन व रन अँड वॉक स्पर्धेचे आयोजन

0
9

       गोंदिया, दि. 14 : 15 नोव्हेंबर 2022 रोजी “बिरसा मुंडा जयंती” निमित्त गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, गोंदिया येथे 18 वर्षावरील युवक- युवतीकरीता 21 कि. मी. हाफ मॅरेथॉन, 16 वर्षावरील युवक-युवतीकरीता 10 कि. मी. मॅरेथॉन व आमंत्रित अतिथीकरीता 03 कि. मी. रन अँड वॉक या स्पर्धांचे आयोजन 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 5 ते 10 वाजता या वेळेत करण्यात आले आहे. यामुळे स्पर्धा वेळेत शहरातील काही मार्ग बंद ठेवण्यात आले असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आल्याचे माहिती जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिली आहे.

      या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता सार्वजनिक सुरक्षिततेच्या व स्पर्धकांचे जीवितास धोका होवू नये या दृष्टीने स्पर्धा कालावधीकरीता आमगाव ते गोंदिया, तिरोडा, रावणवाडी व कोहमारा ते गोंदिया, रावणवाडी, आमगाव मार्गावरील वाहतूक 15 नोव्हेंबर मंगळवारी सकाळी 5 ते 10 यावेळेस तात्पुरती बंद असणार आहे. उपरोक्त मार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळती करण्यात आली आहे. अशी अधिसूचना जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी निर्गमित केली आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

      उपरोक्त मार्गाने आवागमन करणारी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, जड-अवजड वाहने (एस. टी. बसेस, ॲम्बुलन्स, अग्निशामक दलाची वाहने, स्कुल बसेस वगळून) पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे. तसेच पतंगा चौक मार्गे, कारंजा टी पाँईट मार्गे, जिल्हा क्रीडा संकुल कडून मरारटोली जंक्शन मार्गे, मरारटोली जंक्शन कडून बायपास रोडने कारंजा टी पाँईट मार्गे इतरत्र जाणाऱ्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, जड-अवजड वाहनांना ( एस. टी. बसेस ॲम्बुलन्स, अग्निशामक दलाची वाहने, स्कुल बसेस वगळून) आवागमन करण्यास बंदी करणे आवश्यक आहे, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

          गोंदिया जिल्हयातील खालील मार्गाकरीता व खालील वर्णनाच्या व आकारमानाच्या वाहनांकरीता 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 05.00 वा. ते 10.00 वा. पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग- आमगाव ते गोंदिया, तिरोडा व रावणवडी या मार्गावरील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, जड-अवजड वाहनांसाठी (एस. टी. बसेस ॲम्बुलन्स, अग्निशामक दलाची वाहने, स्कुल बसेस वगळून) आमगाव- ठाणा-खमारी- कटंगी (रावणवाडीकडे) मरारटोली जंक्शन-कुडवा नाका-गोंदिया-तिरोडा हा पर्यायी मार्ग उपलब्ध असणार आहे. तसेच कोहमरा ते गोंदिया-रावणवाडी मार्गावरील सर्व वाहतुकीसाठी कोहमारा-गोरेगाव-झांजिया-सोनी-ठाणा (आमगावकडे) खमारी-चुलोद-टेमनी-कटंगी (रावणवाडीकडे) मरारटोली जंक्शन-कुडवा नाका-गोंदिया हा पर्यायी मार्ग उपलब्ध असणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्र : पतंगा चौक मार्ग, कारंजा टी पॉईट मार्ग, जिल्हा क्रीडा संकुल कडून मरारटोली जंक्शन मागे, मरारटोली जंक्शन कडून बायपास रोडने कारंजा टी पॉईट मार्गे इतरत्र जाणाऱ्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, जड- अवजड  वाहनांना (एस.टी. बसेस ॲम्बुलन्स अग्निशामक दलाची वाहने, स्कुल बसेस बगळून) आवागमन करण्यास बंदी करण्यात येत आहे. सदरची अधिसूचना 15 नोव्हेंबर 2022 रोजी स्पर्धेच्या कालावधीत सकाळी 05 वा. ते 10 वा पर्यंत अंमलात राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.