सरपंच म्हणजे ग्रामविकासाच्या पाठीचा कणा – पपीता नंदेश्वर यांचे प्रतिपादन

0
27

अर्जुनी /मोर ता.14:-राजकारण बाजूला सारून ग्रामपंचायतने विकास कामे करण्याची गरज आहे. कारण सरपंच म्हणजे विकासाच्या पाठीचा कणा होय अशी ग्वाही पवनी /धाबेच्या सरपंच पपीता नंदेश्वर यांनी आज (ता.14) बोलताना दिली. तालुक्यातील येरंडी /दर्रे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या आयोजित निरोप समारंभात त्यां अध्यक्ष पदावरून बोलत होत्या.मंचावर निवर्तमान सरपंच मनिषा शहारे, उपसरपंच सोनिया वाढई, सर्व सदस्यगण बेबीबाई मारगाये, पारबता मिरी, गीता वाढई, मंदा शहारे, नंदा जुनाके, जिजाबाई सोनवाने आदि सदस्यांना निरोप देण्यात आला.
श्रीमती नंदेश्वर पुढे बोलताना म्हणाल्या कि, येरंडी /दर्रे च्या जनतेनी निर्विरोध निवडून देऊन फक्त महिलांच्याच खांद्यावर ग्रामपंचायतीची जबाबदारी सोपविली याची त्यांनी जोरदार प्रशंसा केली. महिलांचा सन्मान करणे हे संवैधानिक कर्तव्य असून भारतीय संविधानामुळे महिला किती प्रगत होत चाललेल्या आहेत याची जाणीव होते असे त्या म्हणाल्या.याप्रसंगी सत्कार मूर्ती मनिषा शहारे, आणि सोनिया वाढई यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना ग्रामविकासासाठी नेहमीच तत्पर राहण्याचा आपला मानस आहे, असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी सर्वांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सवित्रीआई फुले, जणनायक बिरसामुंडा यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविक ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी तर संचालन करून शिक्षक संचित वाडवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी जीवन कुंभरे, सतिश साखरे, तुलाराम वाढई यांनी सहकार्य केले.