आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे दिवाळी अंकप्रदर्शनीचे उद्घाटन

0
8

गोरेगांव- तालुक्यातील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे आज दिनांक ३ नोव्हेंबरला दिवाळी अंक प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष एन एम डी महाविद्यालय गोदियाचे ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा डॉ.सुनील जाधव हे होते.तर उद्घाघाटन गोंदिया जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती अस्मिता मंडपे होते.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अतिथी भंडारा जिल्हा ग्रंथालय अधिकारी खोंमेन्द्र बोपचे, गोंदिया जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव डी. डि. रांहागडाले, सेवानिवृत्त प्राचार्य एफ. आर.बिसेन,डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय देवरीचे ग्रंथालय प्रमुख प्रा. डॉ.तुषार गेडाम, रविंद्र वाचनालय चोपाचे सचिव बि. बी. बहेकार, संस्थेचे उपाध्यक्ष मदनलाल बघेले, संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय. डी.चौरागडे, सदस्य हिरालाल महाजन, सुभाष चौरागडे, देवदास चेचाने, चंन्द्रकुमार चौरागडे,डि आर चौरागडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.यावेळी प्रस्थाविकातुन संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय.डी.चौरागडे यांनी ग्रंथालयाचे प्रगती अहवाल वाचुन ग्रंथ प्रदर्शनीचे जास्तीत जास्त गांवकरी नागरिक फायदा घ्यावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक खोंमेन्द्र बोपचे यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीनी ग्रंथांचे वाचन करावे व आपल्या पाल्यांना सुध्दा जास्तीत जास्त ग्रंथ वाचनाची सवय लागवी याकरिता प्रयत्न करावे. कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती अस्मिता मंडपे यांनी ग्रंथालयाची प्रगती बघुन समाधान व्यक्त केले व ग्रंथालयातील ग्रंथ हे वाचकापर्यत पोहचले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ सुनील जाधव यांनी युवापिढीनी जास्तीत जास्त वेळ हा ग्रंथालयात येऊण ग्रंथाचे वाचन करून येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेत अभ्यास करून भरघोस यश प्राप्त करावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रंथालयात प्रथमच आल्याबद्दल प्रमुख पाहुणे यांचे संस्थेचे वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय. डी. चौरागडे तर संचालन संस्थेचे सदस्य जे. जे. पटले व कार्यक्रमाचे आभार नरेंद्रकुमार चौरागडे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानी करण्यात आली. कार्यक्रमाला आशा चेचाने, प्रवीन येरखडे, दुर्गेश चेचाने, मुकेश बिजेवार, वैशाली चौरागडे आदीनी सहकार्य केले कार्यक्रमाला गांवातील युवक, नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्तित .