बंजारीटोला येथे विद्यार्थ्यांना गणवेश वितरण

0
26

*गौतम कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी प्रेरणादाई – रामटेके

आमगाव : जवळील बंजारीटोला येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना गौतम कुटूंबायांकडून गणवेश वितरण व शाळेला आलमारी भेट देण्यात आली.समाजात मुलांचा वाढदिवस मोठ्या पर्ट्या देऊन केली जाते, पण या सर्व बाबींणा सावरून दुर्गेश गौतम यांनी शाळेकरी मुलांना गणवेश व शाळेला लोखंडी कपाट भेट म्हणून दिली.
या प्रेरणादायी दृष्टीकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे गटशिक्षणधिकारी आर.पी. रामटेके यांनी मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी.प.स. सभापती कुवरलाल पारधी,उदघाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी आर.पी. रामटेके प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी आर.एस. येटरे, केंद्रप्रमुख जी.टी.रहांगडाले,सरपंच मायाबाई सोनवाने,उपसरपंच भोजराज सोनवाने, मुख्याध्यापक नांदगाये,एस.आर.खोब्रागडे,राजेश सोनवाने,संभाजी परिहार,गंगाबाई सोनवान,वर्षाबाई सोनवाने,मायाबाई गौतम,के.पी.रहांगडाले,टेकचंद सोनवाने, जयचंद गौतम,धाकचंद पारधी,गणेश, हरिनखेडे, योगेश हरिनखेडे,भुमेश्वर बिसेन,ओमकार सोनवाने,विनोद सोनवाने,सागर गौतम,भुपेंद्र पटले प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी माहीर दुर्गेश गौतम यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीच्या मुलांना गणवेश वाटप सेच शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन्सिल आणि मानेकसा येथील मुख्याध्यापक डी. जे. गौतम यांच्याकडून पूर्व माध्यमिक शाळा बंजारीटोला येथे अलमारी भेट दिली. कार्यकामाचे संचालन दिलीप होटे तर आभार नांदगाये गुरुजी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविकांता गौतम,,महेश गौतम, कमलेश गौतम,भागरता कोसरे प्रमिला हरिनखेडे यांनी परिश्रम घेतले.