लोकाभिमुख प्रशासन हीच प्राथमिकता- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
63

गोंदिया,दि.16: जिल्हाधिकारी गोंदिया या पदाचा पदभार आज (दि.16) शुक्रवारला चिन्मय गोतमारे यांनी स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी गोतमारे यांनी सर्व संबंधित अधिकारी, विभाग प्रमुख यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून कामात येणाऱ्या अडीअडचणी बाबत जाणून घेतले.

यावेळेस सहा. जिल्हाधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, विजय सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव, परवणी पाटील, उपविभागीय अधिकारी गोंदिया, जिल्हा पुरवठा अधिकारी लिना फलके, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, मुख्याधिकारी करण चव्हाण, पंकज गजभिये सूचना विज्ञान अधिकारी(NIC), जिल्हा खानीकर्म अधिकारी सचिन वाढवे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीमध्ये सर्वप्रथम जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात उपजिल्हाधिकारी सामान्य यांच्याकडून निवडणुकीच्या तयारी बाबत चर्चा केली व गोंदिया जिल्ह्यात अतिसंवेदनशील असलेल्या सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह येथे नवीन मतदान केंद्रासाठी करण्यात आलेल्या तयारी व सुरक्षा बाबत आढावा घेतला. यानंतर धान्य खरेदी व भरडाई या संबंधाने करण्यात आलेल्या प्रक्रिया व सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून अन्नधान्याच्या पुरवठा याबाबतची माहिती घेतली.

यानंतर जिल्हाधिकारी गोतमारे यांनी नगरपालिका प्रशासन तसेच विविध विभागातील कार्यप्रणाली व माहिती घेऊन उपस्थित सर्व अधिकारी विभाग प्रमुख तसेच कर्मचाऱ्यांना लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी एकजुटीने काम करण्यासाठी निर्देश दिले. तसेच गुड गव्हर्नन्स करिता कामात पारदर्शिता ठेवण्याच्या सूचना दिल्या.

प्रशासनाकडून नागरिकांना वेळेवर सेवा देणे आपले सर्वांचे कर्तव्य असून जिल्ह्यातील विविध विकास कामांना चालना देण्याची सूचनाही यावेळेस जिल्हाधिकारी यांनी दिली. सदर बैठकीत जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख व कर्मचारी यावेळेस प्रामुख्याने उपस्थित होते.