जिल्ह्यात शांतते मतदान,पहिल्यांदाच मुरकुटडोह येथे मतदान

0
35
सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह येथील मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणारे कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावून सुव्यवस्थित परत आल्या बद्दल सदर पथकाचे मा. जिल्हाधिकारी यांनी पुस्पगुछ देऊन अभिनंदन केले.

गोंदिया-  जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातंर्गत येत असलेल्या अतिसंवदेनशील नक्षलग्रस्त असलेल्या मुरकुटडोह/दंडारी येथे या ग्रामपंचायत निवडणुकीकरीता पहिल्यांदा मतदान केंद्र उभारण्यात आले होते.विशेष म्हणजे येथील नागरिकांना यापुर्वी दरेकसा येथे 15 किलोमीटर अंतरावर मतदानासाठी यावे लागत होते.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या गावात मतदान केंद्र उभारण्यात आले  होते.याठिकाणी 2 वाजेपर्यंत शांततेत मतदान पार पडले.जिल्हाधिकारी ,उपविभागीय अधिकारी,तहसिलदार यांनी भेट मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी यांनी शांततेत मतदान प्रकिया पार पडून परत आल्यानंतर भेट घेत त्यांचे स्वागत केले.

जिल्ह्यातील 348 ग्राम पंचायतींपैकी 345 ग्रामपंचायतींच्या निवडणूका रविवारी 18 डिसेंबर रोजी शांतते पार पडल्या दरम्यान, सरपंच पदासाठी 1 हजार 7 तर ग्रामपंचायत सदस्याच्या 3 हजार 22 जागासाठी 6 हजार 210 उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले. ज्यामध्ये जिल्ह्यातील 1120 केंद्रांवर 5 लाख 32 हजार 144 मतदारांपैकी दुपारी दिड वाजतापर्यंत 2 लाख 99 हजार 13 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्याची टक्केवारी 56.19 टक्के इतकी आहे.
,सालेकसा तालुक्यातील दरेकसा ग्रामपंचायतीत येत असलेल्या मुरकुटडोह येथे पहिल्यांचा मतदान केंद्र देण्यात आले असता येथील मतदानाची वेळ दुपारी 2 वाजतापर्यंत देण्यात आली होती.
सालेकसा तालुक्यात 3 वाजतापर्यंत मतदान
जिल्ह्यातील सालेकसा तालुका नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल तालुका म्हणून ओळखला जात असून या  तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आली होती. त्यामुळे येथील सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजतापर्यंत पार पडले. त्यातच दरेकसा ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 2 मुरकुटडोह येथे पहिल्यांदा मदतान केंद्र देण्यात आले यावेळी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा कालपासूनच मतदान केंद्रावर बंदो.बस्त लावण्यात आला होता.