वाहतुकीचे नियमनाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून 3 लाखाचा दंड वसूल

0
22

  गोंदिया,दि.22ः- गोंदिया जिल्हा वाहतुक विभागाच्यावतीने वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर 12 ते 18/12/2022 या सप्ताहात करण्यात आलेल्या कारवाईत 687 वाहनचालकांवर कारवाई करुन 3 लाख 41 हजार 850 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.यामध्ये मोबाईलवर बोलणे,हेल्मेट न घालणे,कागदपत्र नसणे आदी मुद्यावर ही कारवाई मोहीम चालवण्यात आली.
पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांना आदेशित करून वाहतूकीचे नियम न पाळणाऱ्या, वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने वाहतूक शाखेचे प्रभारी पो.नि.महेश बनसोडे यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार व पथकाद्वारे दिनांक – 12/12/2022 ते 18/12/2022 या सप्ताहात वाहतूकीचे नियम न पाळणाऱ्या, वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर विषेशतः विना लायसन्स वाहन चालविणारे वाहन चालक, विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, विना सीट बेल्ट, कर्न- कर्कश हॉर्न वाजविणारे , अडथळा निर्माण होईल अशी पार्किंग करणे, पोलीसांचा ईशारा न पाळणे आदीवंर कारवाई केली.यात 341 पेड केसेस, 346 अनपेड केसेस अश्या एकूण- 687 वाहतूक कारवाया करण्यात आल्या असून 3,41,850/- रू शुल्क दंड आकारण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वाहतूक पोलीस वाहनावर फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनांचे नंबरप्लेट बदलविण्याची प्रक्रिया राबवून घेण्यात आहे.

सदरची कारवाई  वरिष्ठांचे निर्देश, व आदेशान्वये वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक महेश बनसोडे, यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार, व पथक यांनी सदरची कारवाई केलेली आहे.गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेला असे आवाहन करण्यात येत आहे की, जनतेनी रहदारीचे व वाहतुकीचे नियम पाळावे. व संभाव्य अपघाताच्या घटना टाळण्यासाठी पोलीस दलास वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करावे.