पांगोली नदीच्या पुनर्जीवनकरीता केंद्रीय जलमंत्र्यांना खा.मेंढेचे साकडे

0
29

गोंदिया,दि.22ः- गोंदिया जिल्ह्यातील महत्वपूर्ण ओळख असलेली आणि जिवनदायींनी असलेल्या पांगोली नदीच्या सर्वांगीण पुनर्जीवनासोबतच सौंदर्यीकरणासाठी केंद्रसरकारने लक्ष घालून निधीची उपलब्धता करुन देण्याची मागणी भंडारा-गोंदियाचे खासदार सुनिल मेंढे यांनी आज(दि.22)केंद्रीय जलमंत्री यांच्याकडे केली आहे.

पांगोली नदी नामशेष व लुप्त होण्याच्या मार्गावर असून या नदीच्या पुनरूज्जीवन,संवर्धन, संरक्षण व विकासाचा मार्ग मोकळा होण्यासाठी गेल्या काही वर्षापासून पांगोली नदी बचाव समितीच्या माध्यमातून तिर्थराज उके व त्यांचे सर्व सहकारी काम करीत आहेत.जिल्हा विकास निधीतूनही 10 लाख रुपये या नदीच्या अभ्यासासाठी राखीव कऱण्यात आले.परंतु 70 किमीचा लाबं प्रवास असलेल्या या नदीकरीता हा निधी तोडगा असल्याने खासदार मेंढे यांनी पुढाकार घेत सरळ केंद्रीय जलमंत्र्यानाच साकडे घातले आहे.गोंदिया,गोरेगाव व आमगांव या तीन तालुक्यातून जवळपास 70 कि.मी. प्रवाह क्षेत्रातून वाहणारी ही नदी आहे.गोंदिया,गोरेगांव व आमगांव तालुक्यातील काही भागातील महत्वपूर्ण नैसर्गिक जलस्त्रोत यापासून निर्माण होऊ शकत असल्याने या नदीचा पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला गेला आहे.