भारत राखीव बटालियनने केले 10 हजार वृक्ष लागवड

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

महेंद्र गजभिये/कामठा,गोंदिया- भारत राखीव बटालियन क्रमांक 2 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 गोंदिया येथे दिनांक 26/ 12/ 22 रोजी रोजी वृक्षारोपण तथा सौर ऊर्जा संयंत्र उभारणी योजनेचे भूमिपूजन संपन्न करण्यात आले. याप्रसंगी बटालियनचे समादेशक  विवेक मासाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. भारत राखीव बटालियन बिरसी तथा परसवाडा या ग्राम परिसरात प्रस्तावित आहे. ज्यापैकी प्रथम टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याकरिता मौजा परसवाडा झिलमिली या शिवारात 26.90 हेक्टर जागेत बांधकाम प्रस्तावित आहे. सदर जागा ही गावाशेजारी असून त्या ठिकाणी कसलेही प्रकारचे वृक्ष रोपटी नसल्याने सामाजिक बांधिलकी व पर्यावरणाविषयी जागरूकता लक्षात घेऊन भारत राखीव बटालियन तर्फे सदर जागेवर सुमारे दहा हजार वृक्षरोपटी लागवड करून त्याचे संगोपन करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. सदर ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने वृक्षरोपट्यांना पाणी पुरवठा करणे करिता बरेच दिवसापासून सौर ऊर्जा संयंत्र व पाईपलाईन मंजुरी करिता गटाच्या समादेशक यांचे निर्देशनातून पाठपुरावा सुरू होते.जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती कावेरी नाखले तथा जिल्हा परिषद उपअभियंता नरेंद्र वानखेडे यांचे सहकार्याने 5 लक्ष इतका निधी नक्षलग्रस्त भाग विकास कार्यक्रम योजनेतून मंजूर झाल्याने वृक्षरोपणकरिता पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी झालेली आहे.बटालियनचे सहाय्यक समादेशक संजय साळुंखे, कैलास पुसाम,मंगेश शेलोटकर यांनी वेळोवेळी आढावा घेतला. सदर योजनेच्या मंजुरीकरिता बटालियनचे पोलीस कल्याण अधिकारी सुनील चव्हाण यांनी सतत पाठपुरावा करून सदर योजना बटालियन करिता किती आवश्यक आहे याचे महत्त्व पटवून देऊन निधी प्राप्त करून घेण्याकरिता विशेष परिश्रम घेतले, याकरिता त्यांना बटालियनचे जवान हंसराज बिसेन, नित्यानंद वाघमारे, जागेश ढेंगे यांचे सहाय लाभले.