दिव्यांगांना दिव्य दृष्टी देणारे महान व्यक्ती लुईस ब्रेल – शिक्षणाधिकारी कादर शेख.

0
22

गोंदिया,दि.०४::लहान वयातच अपघाताने एक डोळा निकामी झाला. कालांतराने नशिबी पूर्णतः अंधत्व आले. तरीही हिम्मत न हारता फक्त स्वतःसाठीच नव्हे तर जगातील तमाम अंध बांधवांसाठी ब्रेल लिपी तयार करून अंध बांधवांना शिकण्याचा व समाजात जगण्याचा मार्ग मोकळा केला. असे लुईस ब्रेल हे दिव्यांगांना दिव्य दृष्टी देणारे महान व्यक्ती असल्याचे उद्गार श्री कादर शेख, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी काढले. ते समग्र शिक्षा च्या दिव्यांग विभागामार्फत आयोजित जयंतीनिमित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी लेखाधिकारी आश्विन वाहाने, उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, ज्ञानेश दिघोरे, जिल्हा समन्वयक विजय ठोकणे, विलास मालवार, संगणक प्रोग्रामर नितेश खंडेलवाल, अधीक्षक नरेंद भगत प्रामुख्याने उपस्थीत होते.
यावेळी कादर शेख यांनी विविध जयंती साजऱ्या करन्यामागचा उद्देश काय असतो हे उपस्थितांना मार्गदर्शन केलें व या सर्व महापूरूषांनी केलेले महान कार्य आपण आचरणात आणले पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी गोरेगांव गट्साधन केंद्राचे दिव्यांग विभाग समन्वयक संदीप खोब्रागडे यांनी लुईस ब्रेल यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला समग्र शिक्षा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व कर्मचारी तथा जिल्हयातील गटसाधन केंद्रातील दिव्यांग समन्वयक उपस्थित होते.