स्वपक्षीय सदस्यांनीच दिला उपसरपंच पदासाठी दगा

0
29

सेजगाव येथील प्रकरण
एकोडी : जवळील सेजगाव येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. सरपंच सौ.उषा कठाने यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.दम्यान उपसरपंच पदासाठी तीन उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. यात उपसरपंच पदी टेकचंद बिसेन हे निवडून आले. विशेष म्हणजे उपसरपंच बिसेन यांच्या गटातूनच एका सदस्यांने उपसरपंच पदाच्या निवडणूकीत उडी घेतल्याने त्यांनी स्वपक्षीय गटालाच दगा दिल्याने गावात चर्चाना पेव फुटले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायतच्या निवडणूकीत सेजगाव येथील सरपंचपदी भाजप समर्थित सौ.उषा अरूण कठाणे निवडून आल्या. तर गटाचे तीन सदस्य निवडून आले. तर उर्वरीत राष्ट्रवादी समर्थित ६ सदस्य निवडून आले. आज निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशावरून सभा घेण्यात आली.या सभेत सरपंचच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवड करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी समर्थित गटाचे ६ सदस्य असल्याने कोणताही दगा फटका न होता निवडणूक प्रक्रिया पार पडेल अशी आशा होती.परंतु गटातील सदस्य असलेले तिर्थराज पारधी यांनी आपल्याला उपसरपंच करावे यासाठी भरसक प्रयत्न केले. परंतु गटाच्यावतीने उपसरपंच पदासाठी टेकचंद बिसेन यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्या विरोधात जावून आज पारधी यांनी स्वपक्ष गटाला दगा देत उपसरपंच पदासाठी उमेदवारी दाखल केली. शेवटी त्यांना स्वत:च्या मतावरच समाधानी व्हावे लागले. या प्रकाराने गावात त्यांच्या भूमिकेला घेवून विविध चर्चेला पेव फुटले आहे. तर दुसरीकडे भाजप समर्थित गटाकडून गौरीशंकर पारधी यांना ४ तर राष्ट्रवादी समर्थित गटाचे टेकचंद बिसेन यांना ५ मते मिळाल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाली.