सोबतच पतसंस्थेतील कर्मचारी भरतीवर कायम बंदीचा ठराव सर्वानुमते पारीत
गोंदिया,दि.10ः- जिल्हा परीषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पत संस्था मया॔.गोंदिया र.न.102 च्या विशेष आमसभेमध्ये सभासद हिताचे क्रांतिकारी निर्णय सर्वसम्मतींने पारीत करण्यात आले.या विशेष सभेत 11 टक्के व्याजदर कमी करुन 8.75 टक्के करण्याचा निर्णय घेत जाहीरनाम्यातील गोष्टी पुर्ण करण्याचा प्रयत्न नवनिर्वाचित संचालक मंडळाने पुर्ण केला.सभासदांच्या कल्याणकारी निर्णयासाठी आम्ही पारदर्शक काम करणार असल्याची ग्वाही आमसभेत संस्थेचे कार्यकारी प्रमुख सचिव कमलेश बिसेन यांनी दिली.सभेला संस्थेचे अध्यक्ष मनोज माधो गोंडाने,उपाध्यक्ष आनंदकुमार रामाजी चर्जे,सचिव कमलेश वजीर बिसेन तसेच सर्वश्री संचालक हंसराज प्रेमदास धपाडे,रितेशकुमार किशन शहारे,अजयकुमार विश्वनाथ रामटेके,मनोज वासुदेव भुरे,विरेंद्र नत्थुजी कुंभरे,दिलीप लक्ष्मण शेंडे,ओमेश्वर गिरधारी बिसेन,कुवरलाल मोहनराव रहांगडाले,चंद्रशेखर शिवराम चौधरी,सचिन वसंतराव कुथे,सुनिल खिरसिंग राठोड,नामदेव मुकेश मेश्राम,रविकुमार त्र्यंबक पटले,चंद्रकांत सहसराम धपाडे व संचालिका रेखा रत्नाकरराव पारधी,प्रेमलता राजेश बागडे, संगिता गोर्वधन बिसेन,दिपीका मोहन यादव उपस्थित होते. गोंदिया जिल्हा परीषद व पंचायत समिती
कर्मचारी सहकारी पत संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा रविवार(दि.08)मयुर लाॅन कटंगी (कला) गोंदिया येथे आयोजित करण्यात आली होती. सभा संस्थेचे अध्यक्ष मनोज गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.सभेचे संपूर्ण सूत्र संचालन संस्थेचे कार्यकारी प्रमुख सचिव कमलेश बिसेन यांनी केले. सभेला मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित राहून सर्वांनी आमसभेमध्ये सक्रिय सहभाग घेवून चर्चेअंती निर्णय सर्वसम्मतींने पारीत करण्यात आले. यामध्ये सचिवांनी सदर सभेत कर्जावरील व्याजदर 8.75 करण्याचे प्रस्तावित केले.या प्रस्तावाला आनंदी व उत्साह पूर्ण वातावरणात मंजूर करण्यात आले.उपस्थित सभासदांना सांगितले की, व्यवस्थापक समितीच्या शिफारसीनुसार सभासद कर्जावर 8.75%,सभासद ठेवीवर 6%, आवर्त ठेवीवर एक वर्षाकरीता 6%, तिन वर्षाकरीता 6.50% व पाच वर्षाकरीता 7%
तसेच मुदती ठेवीवरील सुध्दा एक वर्षाकरीता 6%, तिन वर्षाकरीता 6.50% व पाच वर्षाकरीता 7% नुसार अनुक्रमे व्याज दर कमी करण्याचे ठरविले आहे.उपस्थित सभासदांनी व्यवस्थापक समितीच्या या धाडसी निर्णयाबद्दल अभिनंदन
करुन व्यवस्थापक समितीने जे अनुक्रमे व्याज ठरवुन दिले त्यावर सर्वानुमते मंजुरी प्रदान केली.
नोकर भर्तीची गरज़ नसतांना करून केवळ व्यक्तिगत हित साधण्याकरीता संस्थेवर बोजा वाढविण्यात येतो.वास्तविक डिजिटल युग असताना मनुष्यबळाची कमी आवश्यकता असल्याने नाहक शाखा उघडून पदे निर्माण केली जातात जे मुळीच योग्य नाही.याकरीता याकरिता व्यवस्थापक समितीच्या शिफारसीनुसार संस्थेमध्ये नोकर भरतीच्या नविन आकृतीबंदावर कायम स्वरुपी बंदी आणुन नविन पदे आमसभेच्या पुर्वमान्यतेशिवाय न भरणेबाबद उपविधी क्रंमाक.फ.1.9 व्यवस्थापक समितीची कामे व जवाबदा-या मधील 3 दुरुस्ती करण्याकरिता सचिवांनी सभेमध्ये
ठेवले.त्यावर सभेमध्ये उपस्थित सर्व सभासदांनी चर्चेनंतर कायमस्वरूपी नोकर भर्ती आकृतीबंधवर बंदी आणण्यात येवून 17 पदांचा आकृतीबंध अंतिम करुन पुढे पदे वाढविता येणार नाही असा ठराव मंजूर केला.
व्यवस्थापक समितीच्या शिफारसीनुसार कुटुंब कल्याण निधी योजना पुर्ववत सुरु व वेतनातुन 200/- रुपये प्रतिमाह मासीक कपात करणे,सभासद कर्जामधुन 5 टक्के अनिवार्य आणि सुरु केलेला एस.बी.आय. इन्सुरन्स बंद करणे संबंधी सभेत चर्चा करून सर्वानुमते मंजुर करण्यात आले.मागील व्यवस्थापक समितीच्या गलथान व मनमानी कारभाराला कंटाळून तसेच काहींनी आर्थिक कारण समोर करून आपले सभासदत्व रद्द केले.अशा सभासदांना पुन्हा सभासद बनण्याची ईच्छा असल्यामुळे व्यवस्थापक समितीच्या शिफारशीनुसार एक वेळची बाब म्हणून संस्थे मधून 16/11/2022 पूर्वी स्वईच्छेने सभासदत्व रद्द केलेल्या माजी सभासदांना पुनश्च सभासदत्व प्राप्त करण्याकरिता संस्थेमधून सभासदत्व रद्द करतांनी परत घेऊन गेलेल्या सभासद ठेवी व शेअर्सच्या रकमेच्या 5% रक्कम संस्थेमध्ये भरून एकवेळची बाब म्हणून संस्थेमध्ये सभासदत्व देण्याकरीता उपविधी क्र. ड 1.7 सभासदत्वचा राजीनामा दुरुस्ती करून त्यांना पुनश्च सभासदत्व प्राप्त करून देण्याकरिता सचिवांनी ठेवलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. व्यवस्थापक समितीच्या शिफारसीनुसार सभासदांच्या पाल्याकरीता उच्चशिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज रु.5 लक्ष रु.20 लक्ष च्या मर्यादेत 1 टक्के व्याज दर कमी करुन MBBS,BAMS, BDS,CA,CS व IIT,पायलट उच्च शिक्षण अभ्यासक्रमा करिता शैक्षणिक कर्ज उपलब्ध देणयासाठी यादीमध्ये समाविष्ट करण्यास सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली.
सचिव बिसेन यांनी सभेत सांगितले की आजच्या धकाधकीच्या जीवनात सभासद कर्ता व्यक्ति जर मोठ्या आजाराने ग्रस्त झाला तर व्यवस्थापक समितीच्या शिफारसीनुसार सभासदांना आरोग्य संजीवन योजनेतुन ठेवीच्या दुप्पट किंवा 5
लक्ष पर्यत कर्ज पुरवठा करणेबाबत सभेमध्ये उपस्थित सर्व सभासदांना चर्चा करावी.यापूर्वी हृदय शस्त्रक्रिया, हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया, ऍन्जोप्लास्टी,कर्करोग, मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया वरील विद्यकीय कारणास्तव कुटुंब कल्याणनिधी योजनेतुन सभासदांच्या जमे रकमेच्या दुप्पट रक्कम नापरतावा देण्यात येत होती. परंतु तेवढ्या रकमेत गरज भागत नसल्यामुळे त्याऐवजी नवीन आरोग्य संजीवन योजना सुरु करून जमा केलेल्या ठेवीच्या दुप्पट रक्कम उदा . २ लक्ष जमा असल्यास रु ४. लक्ष किंवा रु २ लक्ष ५० हजार जमा असल्यास ५ लक्ष कर्ज स्वरूपात देण्यात येईल व त्या कर्जातून कुटुंब कल्याणनिधी ५ टक्के कपात अनिवार्य राहील. त्यांच्या वारसानाकडून फॉर्म भरून तात्काळ आर टी जि एस करून दवाखान्याच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल त्यावर एक वर्षा पर्यंत व्याज आकारण्यात येणार नाही.त्यानंतर नियमित व्याज आकारण्यात येईल. यावर संस्थेचे सभासद सौरभ अग्रवाल यांनी मेंदूचा पक्षघात या आजाराला वरील यादीत समाविष्ट करावे अशी विनंती केली यावर सभेमध्ये उपस्थित सर्व सभासदांनी सर्वानुमते मंजुरी
प्रदान केली. व्यवस्थापक समितीच्या शिफारसीनुसार आकस्मिक निधन झालेल्या सभासदांना कल्यान निधी मधुन देण्यात येणा-या मदत निधी रू.१५,०००/-च्या ऐवजी रु.२५,०००/- करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
तसेच व्यवस्थापक समितीच्या शिफारसीनुसार संस्थेच्या सभासदांचे 10 वी व 12 वी उत्तीर्ण पाल्यांचा सत्काराची रक्क्म दुप्पट करण्यास मंजरी देण्यात आली.त्यामध्ये 10 वी उत्तीर्ण पाल्यांचा सत्काराची रक्क्म पहिला क्र. रु १०००/- वरून रु.२०००/-, दुसरा क्र. रु ७५०/- वरून रु. १५००/- व 12 वी उत्तीर्ण पाल्यांचा सत्काराची रक्क्म पहिला क्र.रु
१५००/- वरून रु.३०००/- , दुसरा क्र.रु १०००/- वरून रु २०००/-रक्क्म करण्याबाबत सर्वानुमते मंजुर करण्यात आले.
सभासदांच्या मुलीना कन्यादान योजने अंतर्गत लग्नाची भेट म्हणुन रु ५००/- वरून रु २१००/-रक्क्म मुदती ठेवीचे ३ वर्षाचे प्रमाणपत्र ६.५० टक्के वाजदराने देण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले.तसेच संस्थेचे कार्यालयात सभासदांना अडचण होऊ नये म्हणून महिन्याच्या पहिला व तिसरा शनिवारला बँक सुरु राहत असल्यामुळे संस्थेचे कार्यालय नियमित सुरु ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. व्यवस्थापक समितीच्या शिफारसीनुसार जिल्हा परीषदेमध्ये कंञाटी कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना संस्थेमध्ये सभासद करणे निर्णय घेवुन तशी उपविधी क्र.ड1.1 मधील नाममाञ सभासद दुरुस्ती करण्याचा निर्णय समंत करण्यात आला.अध्यक्षांचे परवांगीने वेळेवर येणार्या विषयात सभासद ठेव रु १०००/- च्या ऐवजी रु १५००/- करण्यास सर्वसमंतीने मंजुरी देण्यात आली. विशेष आमसभेत सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कलापथकाच्या माध्यमातून मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 18 विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.




