रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत अदानी पावर प्लांट येथे रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती

0
15

गोंदिया,दि.18: रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत 17 जानेवारी रोजी अदानी पावर प्लांट लिमीटेड, तिरोडा रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून विजय पाटील, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया तर अध्यक्षस्थानी अदाणी पावर स्टेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण जैस्वाल व सुरक्षा प्रमुख राजेन्द्र मुरई हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात अदानी पावर प्लांट लिमीटेड, तिरोडा येथील जड वाहन चालक यांना रस्ता सुरक्षा संबंधाने मार्गदर्शन करण्यात आले.

          तसेच सदर कार्यक्रमाअंतर्गत वाहन चालकांकरिता रस्ता सुरक्षा विषयक ज्ञानाची स्पर्धा आयोजित करुन प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणा-या विजेत्यांना पारितोषीक वितरण करण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमाअंतर्गत अदानी पावर प्लांट लिमीटेड, येथील सभागृहात रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थितांना वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी, हेलमेटचा वापर तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देण्यात येवू नये यासंबधी आवश्यक माहिती देण्यात आली.

          सदर कार्यक्रमात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गोंदियातर्फे विजय पाटील, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, स्वप्निल कुरसांगे व श्रीमती सोनाली डोंगरवार सहा. मोटार वाहन निरीक्षक तसेच अदानी पावर प्लांट लिमीटेड, तिरोडा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण जैस्वाल व सुरक्षा प्रमुख राजेन्द्र मुरई, एच. आर. प्रमुख  हरीप्रसाद अडथाले, बचाव प्रमुख शशिकांत बोशनकर, प्रशिक्षक प्रमुख  विजय गांधेवार, वाणिज्य प्रमुख कृष्ण यादव हे प्रामुख्याने उपस्थित होते.