ग्रामसेवक व सरपंचाचा सत्कार

0
20

गोंदिया,दि.20-जिल्हा परिषदेच्या वतीने शनिवारी (दि.१९) जिल्हास्तरीय सरपंच मेळावा व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ‘आमचे गाव, आमचा विकास’ या विषयावरील कार्यशाळा कटंगीकला येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून पालकमंत्नी बडोले बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे तर प्रमुख अतिथी म्हणून खा.नाना पटोले, खा.अशोक नेते, आ.गोपालदास अग्रवाल, आ.संजय पुराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. िशक्षण व आरोग्य समतिी सभापती पी.जी. कटरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, कटंगीकलाच्या सरपंच कांता नागरीकर यांची उपस्थिती होती. यावेळी उत्कृष्ट काम करणार्‍या सरपंच व सचिवांचा तसेच आदर्श ग्रामसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये बिरसी ग्रामपंचायतचे रवींद्र तावाडे (सरपंच), के.आर.धांडे (सचिव), मुरदोली ग्रामपंचायतचे सुरेशचंद्र भगत (सरपंच), आर.एन. बाहेकर (सचिव), गांधीटोलाच्या रेखा फुंडे (सरपंच), एस.एस .रहांगडाले (सचिव), जेठभावडाचे डॉ.जितेंद्र रहांगडाले (सरपंच), एस.डब्ल्यू. बन्सोड (सचिव), खोपडाचे संतोष बावणकर (सरपंच), एस.एस. गोरे (सचिव), फुक्कीमेटाचे दिगांबर चौधरी (सरपंच), एन.एम. मेश्राम (सचिव), राजगुडाचे पुष्पलता पंचभाई (सरपंच), पी.एन. चाचेरे (सचिव), आदर्श ग्रामसेवक पी.डी. बिसेन, डब्ल्यू.टी.सातपुते, पी.ए. भिलकर, श्रीमती के.एम. बागडे, श्रीमती आर.बी. ढोक, डी.एन. शहारे, नरेंद्र गोमासे, एल.आर. ठाकरे, डी.टी.बिसेन, आय.जी. लांजेवार, कमलेश बिसेन, डी.डी. लंजे, एस.जे. परमार, पी.आर. चौधरी, एस.डब्ल्यू.कुथे, एस.ए.खडसे, भास्कर झोडे, एन.डी. अतकरे, एस.एस. राठोड, आर.बी. बावनकुळे, ओ.जी. बिसेन, जी.डी. चारथळ यांचा समावेश आहे.