पुन्हा गेले टीडीसीचे धान परजिल्ह्यात,तहसिदाराचे पथक नाक्यावर

0
11

 

गोंदिया,-महाराष्ट्र मार्केqटग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळामार्फेत एकाधिकार योजनेतंर्गत खरेदी करण्यात आलेला धान हा जिल्ह्यातीलच राईस मिलर्सला भरडाईसाठी देण्याचा शासन निर्णय असताना  शनिवारला पुन्हा सडक अर्जुनी बाजार समितीच्या खोबा नाक्यावर वडसा येथे ट्रक क्रमांक सीजी ०८,एल ०८०४ ने जाणारा २० टन धान पकडण्यात आला.दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा धान साकोली तालुक्यातील सातलवाडा येथील असल्याचे बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले.ट्रकचालकाकडून कुठलाही सबळ पुरावा न मिळाल्याने ट्रक नाक्यावर अडवून तहसिलदार सडक अर्जुनी यांना माहिती देण्यात आली.त्यानंतर सडक अर्जुनी तहसिलदारांनी यासंदर्भातल्या चौकशीसाठी नायब तहसिलदारांना पाठविले. सदर ट्रकमालक नाक्यावर पोचून कागदपत्र सादर करु शकलेला नव्हता.
१५ मार्च रोजी आदिवासी विकास महामंडळ नवेगावबांधअतंर्गच्या परसोडी केंद्रावरील ४८० पोती धान परजिल्ह्यात गेल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अर्जुनीच्या नाक्यावर फाडण्यात आलेल्या पावतीवरुन स्पष्ट झाले आहे.यासबंधी १६ मार्चच्या अंकात बेरार टाईम्सने मिqलगचे सरकारी धान बाजारात या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते त्या वृत्ताला दुजोरा देणारा प्रकार पुन्हा घडल्याने यावरुन या सर्व प्रकरणात आदिवासी विकास महामंडळाचे स्थानिक अधिकारी आणि भरडाईसाठी ज्या राईस मिलला धान देण्यात आले त्यामध्ये साठगाठ असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोशन बडोले यांनी दिलेल्या माहितीनुसार पुर्ण चौकशी केल्यानंतर सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेकडे असलेल्या धान खरेदी केंद्रावरील धान हे गोंदिया येथील श्री इंड्रस्टी एमआयडीसी गोंदियाला भरडाईसाठी आदिवासी विकास महामंडळाने डीओ क्रमांक५६००८ नुसार दिले होते.त्यानुसार या केंद्रावर धानाची उचल करण्यासाठी ट्रक क्रमांक एमएच ३४,एबी ०९८६ हे धान खरेदी केंद्रावर पोचले.तेव्हा बाजार समितीचे कर्मचारी नजर ठेऊन होते.ट्रकमध्ये ४८० पोती धान भरण्यात आल्यानंतर परसोडी येथील संस्थेला भंडारा येथील आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने वाहतुक परवाना क्रमांक ५६००८(डीओ)नुसार हे धान गोंदिया येथील श्री इंडस्ट्री एमआयडीसी गोंदियाला देण्यात आल्याचे स्पष्ट नोंद असतानाच परसोडी येथील संस्थेने मात्र ट्रक चालकाच्या हाती दिलेल्या पावतीमधील वरच्या भागात खोडतोड असल्याचे बाजार समिती कर्मचारी यांच्या लक्षात आले,त्यामध्ये श्री इंड्रस्टी एमआयडीसी गोंदियाएैवजी देसाईगंज लिहिलेले होते ,त्यामुळे खोबा नाक्यावरुन या ट्रकची नोंद करुन सोडण्यात आले.ट्रक गेल्यानंतर मात्र हा ट्रक देसाईगंजला जाऊ शकतच नाही हे लक्षात आले तोपर्यंत खुप उशीर झालेला होता.बडोले यांच्यानुसार आदिवासी विकास महामंडळ भंडारा चे व्यवस्थापक राजुरकर यांनी याप्रकरणाची भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्यात आली,परंतु त्यांनीही त्याकडे कानाडोळा करीत असे शक्यच नाही असे सांगून बाजू झटकल्याचे बडोले यांनी सांगितले.