जिल्हा पोलीस दलातर्फे “राष्ट्रीय मतदार दिन” उत्साहात

0
21

गोंदिया-संपुर्ण देशभरात २५ जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिवस” म्हणुन साजरा केला जातो. १८ वर्ष पुर्ण केलेल्या नवीन तरुणांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा प्रमुख उददेश असुन या दिवशी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा असे सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनाचे निर्देश आहेत.

त्याअनुषंगाने आज दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर यांचे मार्गदर्शनाखाली “राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त्याने’ शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया, पोलीस ठाणे नवेगावबांध, पोलीस ठाणे केशोरी येथे करण्यात आले. त्याचप्रमाणे “राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त्याने’ शपथेचे वाचन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे पोलीस उप-अधिक्षक (मुख्या.) गोंदिया श्री. दिनकर ठोसरे, यांनी राष्ट्रीय मतदार दिवस’* शपथेचे वाचन करुन त्या पाठोपाठ उपस्थित पोलीस अधीकारी/ पोलीस अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ यांनी शपथेचे वाचन केले.

त्याच प्रमाणे पोलीस ठाणे नवेगावबांध, पो. ठाणे केशोरी येथे “२५ जानेवारी *राष्ट्रीय मतदार दिवस* निमित्त्याने” शपथ विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन शपथ घेण्यात आली.

मा.वरिष्ठांचे मार्गदर्शनात राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ, पो.ठाणे तील अधिकारी व पोलीस अंमलदार, सी-60 पथकातील पोलीस अंमलदार तसेच लायब्ररीचे मुले-मुली, तसेच पो.ठाणे केशोरी येथे नक्षलग्रस्त भागातील नवतरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून शपथ घेतली .