युवा स्वाभिमानचे तहसीलदारांना निवेदन

0
7
सालेकसा : युवा स्वाभिमान संघटना सालेकसाच्या वतीने स्थानिक तहसीलदारांमार्पâत मुख्यमंत्र्यांना विविध समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान निवेदनातील मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास युवा स्वाभिमान तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे.
 सालेकसा तालुक्यातील महत्वपूर्ण रस्ता असलेल्या साकरीटोला-सालेकसा या मार्गाचे बांधकाम अनेक दिवसांपासून रखडले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण विनाविलंब १५ दिवसाच्या आत सुरू करण्यात यावे, पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत वाघ नदीवरील तिरखेडी पुलाचे बांधकाम त्वरीत पुर्ण करण्यात यावे, अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकNयांना आर्थिक मदत करावी, सालेकसा तालुका पुर्णत: दुष्काळग्रस्त घोषित करून तालुक्यातील शेतकNयांना सरसकट आर्थिक मदत तथा त्यांना शासनाने कर्जमाफी द्यावी, शेतकNयांच्या शेतमालाला खर्चावर आधारीत विंâमत मिळावी, शेतकरी पुत्रांना परीक्षा शुल्कात सुट देण्यात यावी, शेतकNयांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वेंâद्रांची नि:शुल्क व्यवस्था करण्यात यावी, सालेकसा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकNयांना त्यांच्या शेतातील व गाव शिवारातील मोहपुâल व इतर उत्पादनांचे संकलन व संग्रह करण्याची परवानगी देण्यात यावी, मागासवर्गीय विद्याथ्र्यांना शैक्षणिक सत्रातच शिष्यवृत्ती मिळावी, प्रकल्पग्रस्त सुशिक्षीत बेरोजगार, अंशकालीन कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, रोजगार सेवक व इतर बेरोजगारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अनुसूचिज जाती जमातीच्या विद्याथ्र्यांकरीता सुरू असलेल्या वसतीगृहात भौतिक सुविधा आणि शिक्षकांची पुर्तता करण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आले आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास युवा स्वाभिमान तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी युवा स्वाभिमानचे जिल्हा संयोजक सुनिल वाघमारे, महासचिव धनजीत बैस, सहसचिव गणेश भदाडे, अजय शहारे, कमलेश बोपचे, आकाश बावनकर, अरविंद पुंâडे, राजु दोनोडे, गुणाराम मेहर आदिंसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.