सौंदडनजीक भाविकांची ट्रॅव्हल्स तलावात उलटली : एक ठार, सात गंभीर 

0
14
सौंदड/गोंदिया,दि.२५ : जगन्नाथपुरीहून चारधा‘ यात्रा करून अहमदनगर जिल्ह्याकडे परतीच्या वाटेवर असलेली भाविकांची ट्रॅव्हल्स राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सौंदड येथील तलावात उलटली. या घटनेत एकजण ठार, सात गंभीर, तर १६ जण किरकोळ जखमी झाले.
 गंभीर जखमीवर भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात, तर जखमीवर साकोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृताचे नाव संदीप मारोती वाघमारे(वय ३५) असे आहे. अपघाताची माहिती मिळताच माजी उपसभापती दामोदर नेवारे याच्यासंह गावातील नागरिकांना धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला.पोलीस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांनी स्वत घटनास्थळी पोचून परिस्थिती सांभाळली.
अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ४५ भाविक जगन्नाथपुरी आणि चारधाम यात्रेकरिता १५ दिवसांपूर्वी ट्रॅव्हल्सने गेले होते. दर्शन घेवून भाविक परतीच्या वाटेवर होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सौंदड गावानजीक चालकाचे संतुलन सुटल्याने महामार्गाच्या बाजूला असलेल्या तलावात ट्रॅव्हल्स(एमएच१६, क्यू ९९५१) उलटली. ही घटना आज, शुक्रवारी पहाटे ३ वाजून ५३ मिनिटांनी घडली. या घटनेत क्लिनर संदीप मारोती वाघमारे याचा घटनास्थळावर मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन सौंदड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.
 उर्वरित जखमींना भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील ग्रामींण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यातील रायीबाई रामदास कोलते(वय ९०, रा. शहापूर), रंभाबाई रावसाहेब मस्के(वय ६३, रा. तेलकुटगाव), जयाबाई रावसाहेब काळे (वय ७०, रा. तेलकुटगाव), पुश्पलता शिवनाथ मोरे(वय ६०, रा. तेलकुटगाव), इंदुबाई काकासाहेब घुगे(वय ४५, रा. पुसशिळ) आणि बंशी रघुनाथ काळे (वय ६०, रा. तुलकुटगाव) जि. अहमदनगर हे गंभीर असल्याने त्यांना भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित रमांकांत विठ्ठल बोके (वय ५८), प्रतिभा रमाकांत बोटे (वय ५३), सुमनबाई आनंददास मस्के (वय ६५), दत्तात्रय लक्ष्मण िंशदे (वय ५०), शोभा प्रल्हाद काळे (वय ४०), भजदास पंढरीनाथ मस्के (वय ७०), हु‘न जगन्नाथ पातळे (वय ५०), परीयांगा निवृत्ती वाघमारे (वय ५०), मुक्ता अशोक शेंडे (वय ४०), हनुबाई परसराम तांगळे (वय ५५), अशोक व रामकृष्ण साबळे (वय ५५), मंगल रामदास शेंडे (वय ४०), चंद्रकला लक्ष्मण भेंडे (वय ५०), दयाबाई रावसाहेब पाटील (वय ६०), भोजराज आप्पाजी शिंदे (वय ६६), आशा भोजराम शिंदे (वय ५८), मंगल बाबासाहेब देवकर (वय ५६), ओमकार पांडुरंग चौव्हाण (वय ४१), हवरकाबाई वैशू काळे (वय ६५), हिराबाई नामदेव ‘नकर (वय ६०), नामदेव व श्रीधर मनकर (वय ६५), भाष्कर पंढरीनाथ तुरकीळे (वय ६४), काशीनाथ अनंदा बनकर (वय ६७), शिवनाथ त्र्यंबक मराठे (वय ७०), राकबाई प्रताप मराठे (वय ५५), प्रतापqसह व संतराम कवठे, सुलोचना भाऊसाहेब तारडे (वय ६५), मधुराबाई बन्सी काळे (वय ६०), बन्सी रघुनाथ काळे (वय ७०), पुष्पा अशोकराव साबळे (वय ५०), रायबाई रामदास कोळते (वय ९०), चंद्रकला भाष्कर वरजणे (वय ६५), कुमोदनी त्र्यंबक कुळकर्णी (वय ५७) यांच्यावर साकोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. सर्व भाविक अहमदनगर जिल्ह्यातील नेवसा तालुक्यातील नेवसा तालुक्यातील चांदा आणि तेलकुटगाव येथील आहेत. उर्वरित पाच भाविक औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याची माहिती डुग्गीपार पोलिसांनी दिली.