‘शिवब्रिगेड करंडक’चा मानकरी ठरला अकोल्याचा विशाल नंदागवळी

0
9

चंद्रपूर-शिवब्रिगेड संघटनातर्फे आयोजित ‘शिवब्रिगेड करंडक’ भव्य राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा चंद्रपूर शहरातील मातोश्री सभागृह तुकुम येथे सकाळी ११ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत अशी सलग बारा तास चालली आणि या स्पर्धेने चंद्रपूरच्या वक्तृत्व क्षेत्रामध्ये नव्याने इतिहास रचला. बोलणार्‍यांना एक हक्काचे विचारपिठ मिळावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अकोल्याच्या विशाल नंदागवळी यांनी प्रथम क्रमांक पटकावून शिवब्रिगेड करंडक-२0२३ चा पहिला मानकरी होण्याचा मान मिळविला.
‘शिवब्रिगेड करंडक’ राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण ६0 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरू, ओबीसी जनगणना हक्काची लढाई, शेतावरच्या बांधावर लटकलेला कृषिप्रधान भारत, सांग सखे प्रेमात आणखी वेगळं काय असतं, आश्‍वासनाच्या कागदावरच वेगळा झाला विदर्भ माझा, घरी सडून मरण्यापेक्षा चळवळीत लढून मरा, कारण जात माझी धर्म माझा फक्त संविधान आहे आणि सांगा साहेब आम्हा बेरोजगार युवकांच तुम्ही काय करायचं ठरवलंय? अशा एकूण आठ विषयावर आपले मत व्यक्त केले. एकूण स्पर्धकामधून २0 स्पर्धकांची निवड उत्स्फूर्त आणि अंतिम फेरी करण्यात आली. यामध्ये स्पर्धकांना वेळेवर विषय देण्यात आले आणि त्यांना तीन मिनिटात आपले मत व्यक्त करावयाचे होते. पुढे प्राथमिक फेरी आणि उत्स्फूर्त फेरीचे गुण मिळवून अंतिम निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये अकोल्याचा विशाल नंदागवळी प्रथम, चंद्रपूरचा अनिकेत दुर्गे द्वितीय तर धुळ्याच्या धर्मेश हिरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. चंद्रपूर जिल्हाचा विशेष वक्ता पुरस्कार राजुरा येथील स्वाती मेर्शाम यांनी पटकाविला तर प्रोत्साहन क्रमांक विनय पाटील (नागपूर), वैष्णवी हागोणे (अमरावती), अविनाश रामटेके (चंद्रपूर), सुशील दहिवले(चंद्रपूर), चांदणी धनकर (चंद्रपूर), विशेष प्रोत्साहन क्रमांक विभू ठाकरे (चंद्रपूर), अंशुल गोडे (चंद्रपूर) यांनी पटकाविला.
राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे उद््घाटन चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विचारपिठावर अड पुरुषोत्तम सातपुते, सूर्यकांत खनके, डॉ. सौरभ राजूरकर, इंजि. रमिज शेख, नम्रता ठेमस्कर, पप्पू देशमुख, नवनाथ देरकर, दिलीप वावरे उपस्थित होते. तर बक्षीस वितरण प्रसंगी शिवब्रिगेड संघटनेचे सतीश मालेकर, मयूर पाऊणकर, आनंदराव अंगलवार, नम्रता ठेमस्कर, अनिल डहाके, उमेश कोराम, रिल्स स्टार ईशा झाडे, प्रीती मालेकर उपस्थित होते. शिवब्रिगेड करंडक भव्य राज्यस्तरीय खुली वकृत्व स्पर्धेला परीक्षक म्हणून बळीराज निकोडे, रत्नाकर शिरसाट, श्रीकांत साव यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी ओबीसी प्रवगार्तून प्रथम आल्याबद्दल निरंजना भोयर, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल प्रीत म्हशाखेत्री आणि सामाजिक कार्याबद्दल विशाल शेंडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रलय म्हशाखेत्री यांनी केले, तर आभार सूरज दहागावकर यांनी मानले.
आयोजनाकरिता शिवब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश मालेकर, प्रदेश सचिव इंजि. विक्रांत टोंगे, जिल्हाध्यक्ष मयूर पाऊणकर, जिल्हा सचिव प्रलय म्हाशाखेत्री, प्रवक्ता विशाल शेंडे, स्पर्धा समन्वयक म्हणून सूरज दहागावकर, हर्षल साळवे, ऋषिकेश तांडेकर, प्रीत म्हशाखेत्री, कौशिक माथनकर, अमोल मोरे, अश्‍विनी नंदेश्‍वर, प्रकाश पडवेकर, संतोष देरकर यांनी सहकार्य केले.