गोंदिया : पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांची जयंती वसंत पंचमी पर्वावर साजरी करण्यात येते. यंदाही वसंत पंचमीच्या पर्वावर शहरात पवार प्रगतीशील मंच गोंदिया, फुलचूर, छोटा गोंदिया, मुर्री, कुडवा, सूर्याटोला आदी गावात राजाभोज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून आज ४ फेब्रुवारीला गोंदिया शहरात भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.फूलचूर व मुर्री येथून आलेल्या रॅलींचे स्वागत जयस्तंभ चौकात करण्यात आले.
त्यानंतर या दोन्ही रॅली व पवार प्रगतीशील मंच गोंदियाची रॅली एकत्र येत शहर भ्रमंती करीत महारॅलीचा समारोप नेहरु चौकात करण्यात आले.या रॅलीमध्ये समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये पारंपारीक वाजंत्रीसह खाचर आणि बैलबंडी हे आकर्षणाचे केंद्र ठरले होते.जयस्तंभ चौक,गांधीप्रतीमा ,चादंणी चौक,गोरेलाल चौक मार्गक्रमण करीत रॅली नेहरु चौकात पोचली.त्याठिकाणाहून फूलचूर येथील रॅली फुलचूरकडे व मुर्री येथील रॅली मुर्रीकडे रवाना करण्यात आले.
