धनेगाव येथे चक्रवर्ती राजाभोज जयंती,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
19

तुमसर,दि.05ः– सिहोरा क्षत्रीय पोवार समाज संघठन धनेगाव च्या वतीने तुमसर तालुक्यातील धनेगाव येथे चक्रवर्ती सम्राट राजाभोज जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सर्वप्रथम सकाळी ग्राम स्वच्छता अभियान, गडकालिका पूजन,शोभायात्रा,हळदी कुंकू,पोवारी आर्केष्ट्रा व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे स्मृती चिन्ह देऊन पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.पाहुण्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शनही केले. व्यासपीठावर माजी खा.शिशुपाल पटले, पोवार समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.मुरलीधरजी टेभरे, पोवार काव्य लेखक ऍड.देवेंद्र चौधरी,जि.प.सदस्या सौ. सुषमाताई पारधी,डी.एच.बघेले,टी के भगत,देवेंद्र पटले,रहांगडाले,मुकेश पटले,इश्वरदयाल पारधी,हरिदास ठाकरे,माजी सरपंच नोकेश्वर पारधी,त्रीनंद कटरे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री.सुधीर पुंडे,अरविंद बोपचे,वैभव पारधी,अनोज पटले,नारेश ठाकरे,प्यारेलाल रहांगडाले यांनी परिश्रम घेतले.