कर्मचारी कल्याण निधीत पैसा असतांना क्रिडासमेंलनासाठी वर्गणीची गरज का?

0
54

शिक्षकांना स्पर्धेत प्रवेशावर निर्बंध मग कंत्राटी कर्मचार्यांना संधी कशी

सीईओ,अती.सीईओ,जि.प.अध्यक्षासंह कर्मचारी महासंघाची भूमिका संशयास्पद

गोंदियाः गोंदिया जिल्हा परिषदेच्यावतीने अनेक वर्षाच्या कालावधीनंतर जिल्हापरिषद,पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कर्मचारी वर्गासाठी क्रिडा व सांस्कृतीक समेंलनाचे आयोजन यावर्षी ९ व १० फेबुवारीला करण्यात आले आहे.या क्रिडा समेंलनासाठी कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून वसुलीचा फतवा जारी करण्यात आलेला आहे.जेव्हा की वास्तविकता असे की कर्मचारी कल्याण निधी म्हणुन १००/- रूपये प्रती कर्मचारी शिक्षकासह वेतनामधुन कपात करण्यात आलेले आहे.ती रक्कम जवळपास ६ ते ७ लक्ष रूपये जिल्हानिधी मध्ये आजच्या घडीला जमा असायलाच हवी.तरीही वर्गणीच्या माध्यमातून रक्कम गोळा करण्याचा अट्टाहास करणारे ते कोण आणि त्यांचा शिक्षकांना विरोध का यावर आत्ता विचारमंथनाची गरज झाली आहे.

विशेष म्हणजे शिक्षकाकंडूनही ही रक्कम घेण्यात आलेली असताना जिल्हा परिषदेचे सीईओ,अतिरिक्त सीईओ आणि जिल्हा परिषद कर्मचारी महासंघासह इतर कर्मचारी संघटनांना या समेंलनात मात्र शिक्षक नको अशी स्पष्ट भूमिकाच बैठकीत ठेवण्यात आली होती.यावरुन जिल्हा परिषदेत मोठ्या संख्येने असलेल्या शिक्षकांना फक्त कामासाठी वापरून घ्यायचे हे धोरण सीईओ,अतिरिक्त सीईओ,जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी भूमिका स्विकारली असे म्हणायलाही काही हरकत नाही.

या समेंलनासाठी कर्मचारी कल्याण निधीचा रक्कम असताना पुन्हा कर्मचारी वर्गाकडून 100 रुपये अतिरिक्त वसुली कशासाठी हा प्रश्न निर्माण झालेला आहे.सोबतच विभागप्रमुखांसह इतर अधिकारी,अभियंते,बीडीओ, गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी आदी अधिकारी वर्गाकडून 5 हजार रुपये वर्गणी म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या रोखपालाकडे जमा करण्याचे अधिकृत आदेशच सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी काढले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी म्हणजेच जिल्हापरिषद अशी भूमिका घेणारे कर्मचारी संघटनेचे नेते हे मात्र आपले कर्मचारी कामाप्रती किती पारदर्शक असतात याकडे कधी लक्ष देणार.शिक्षक मोठ्या संख्येने असल्याचे सांगून त्यांच्या मौलिक अधिकाराचे हणन करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी संघटनाना कुणी दिले अशाही या क्रिडा समेलनातून निर्माण झालेला आहे.एकीकडे कंत्राटी कर्मचारी वर्गाला सहभागी करुन घेत असताना त्यांना नाकारणे कुठपर्यत न्यायसंगत आहे हे आत्ता सीईओं, जि.प अध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीनीच जाहीरपणे सांगण्याची गरज झाली आहे.

या समेलनाचे उदघाटन ९ फेबुवारीला सकाळी ८ वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांच्या हस्ते होणार आहे.
‘ात्र जिल्हा परिषदेच्ङ्मा ङ्मा सांस्कृतिक व क्रिडा स‘ेंलनात जिल्हा परिषदेच्ङ्मा शिक्षण विभागातंर्गत काङ्र्मरत असलेल्ङ्मा शिक्षकांना डावलण्ङ्मात आले आहे.एकीकडे जि.प.कर्‘चारी अधिकारी ङ्मांच्ङ्माकरीता हे सम्‘ेलंन असताना शिक्षक जिल्हा परिषदेचे कर्‘चारी नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जेव्हा की कंत्राटी तत्वावर लागलेल्ङ्मा कर्‘चाèङ्मांना सम्‘ेलनात सहभागी होता ङ्मेणार आहे.विशेष म्हणजे ङ्मा स‘ेलनातील विविध काङ्र्मक्र‘ासाठी खेळासह इतर स्पर्धेत भाग घेत असलेल्ङ्मांची नावे नोंदविण्ङ्मासाठी ‘ात्र शिक्षण विभागाने १०-१२ शिक्षकांची निवड केली आहे.एकीकडे नाव नोंदणीकरीता शिक्षकांची सेवा ग्राह्य धरली जात असताना स‘ेंलनातूनच त्ङ्मांना डावलण्ङ्मा‘ागचा हेतू काङ्म ङ्मावर जिल्हा परिषदेचे अध्ङ्मक्ष बोलणार की बघ्ङ्माची भू‘िका घेणार ङ्माकडे लक्ष लागले आहे.
कायक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणवीर,अर्थ व बांधकाम सभापती संजयसिंह टेंभरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथे,महिला बालकल्याण सभापती श्रीमती सविता पुराम व समाजकल्याण सभापती श्रीमती पुजा सेठ या उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८ वाजेपासून विविध क्रिडा खेळांना सुरवात होणार असून आरोग्य तपासणीही केली जाणार आहे. त्यानंतर सायकांळी ४ वाजता जिल्हा परिषद सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.१० फेबु्रवारीला सकाळी ८ वाजता क्रिडा स्पर्धेतील अंतिम स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. तर सायकांळी ४ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचा समारोप ठेवण्यात आलेला आहे. समारोपानंतर कर्मचारी अधिकारी वर्गाकरीता अल्पोहाराची सोय सायकांळी ६ वाजता करण्यात आली आहे.या स्पर्धेमध्ये पं. समिती व जिल्हा परिषदस्तरावर कार्यरत अधिकारी व कर्मचारी हे सहभाग नोंदवू शकतात असे आवाहन जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांनी केले आहे.