‘गडचिरोली महा मॅरेथॉन – २0२३’ च्या लोगोचे अनावरण

0
5

गडचिरोली -पोलिस दलातर्फे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासी तरूण युवक-युवतींना स्पध्रेच्या माध्यमातून एक संधी निर्माण व्हावी, तसेच आदिवासी भागात विकास व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने ५ मार्च रोजी भव्य मॅरेथॉन स्पध्रेचे आयोजन करण्यात आले. या स्पध्रेच्या लोगोचे अनावरण ६ फेब्रुवारी रोजी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या हस्ते करण्यात आले.
या भव्य मॅरेथॉन स्पध्रेत, समाजाच्या सर्व स्वरातून आबालवृद्धांच्या सुमारे १0 हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. स्पध्रेत वेगवेगळय़ा वयोगटासाठी वेगवेगळे अंतर असून विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. सहभागी सर्व धावटूंना किट, टी-शर्टा, मेडल्स, प्रमाणपत्र व विजेत्यांना रोख बक्षीस आदी देण्यात येणार आहे. स्पध्रेची तयारी पोलिस आीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. स्पध्रेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी आपल्या जवळच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोस्टे, उपपोस्टे, पोमके येथे संपर्क साधावा. मॅरेथॉन स्पध्रेची नोंदणी मोफत असणार असल्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे. मॅरेथॉन स्पध्रेची तयारी व व्यवस्था गडचिरोली उपविभागीय अधिकारी प्रणिल्ड गिल्डा पाहत आहेत.