अदानीच्या महघोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करा,भाकपाची निदर्शने

0
17

 गोंदिया,दि.13ः- अदानी कार्पोरेट महाघोटाड्याची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करणे तसेच केंद्र शासनाच्या जनविरोधी  व भांडवलदार धार्जीणे बजेटच्या विरोधात भारतीय  कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रव्यापी निषेध आंदोलन आव्हानातंर्गत आज पक्षाच्या गोंदिया जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी येथील एसडीएम कार्यालयासमोर निदर्शने केली. आंदोलनाच्या माध्यमातुन राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांचे नावे  एसडीओ यांना निवेदन सादर केले. या आंदोलनात प्रामुख्याने कॉ.शिवकुमार गनवीर (राष्ट्रीय परिषद सदस्य), कॉ.हौसलाल रहांगडाले (राज्य कार्यकारिनी सदस्य),मिलिंद गणविर (जिल्हा सचिव),रामचंद्र पाटील, करूणा गणवीर,परेश दुरूगवार, प्रल्हाद ऊके,चरणदास भावे,कल्पना डोंगरे,जितेंद्र गजभिए,ललित वैद्य,प्रकाश चौरे,कुथेकर सह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. निवेदनात हिंडेनबर्ग रिपोर्टने अदानी कार्पोरेट महाघोटाळा उघड़ केल्याने या आर्थिक महाघोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती तर्फे चौकशी करणे. एलआयसी तथा एसबीआई व अन्य सार्वजनिक संस्थाचे  87 हजार कोटी रूपयाची अदानी कार्पोरेटने केलेली आर्थिक गुंतवणुकीची तत्काल वसुली करुन दोषी संचालकाना अटक कऱणे आदी मागण्यांचा समावेश आहे.