14 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रात होणार “आरोग्याकरीता सायकल” रँलीजचे आयोजन

0
14

गोंदिया- आझादि का अमृत महोत्सव या वर्षानिमित्त आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कार्यान्वित सर्व आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र येथे प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला एक दिवस आरोग्य मेळावा आयोजित करणे बाबत मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार डिसेंबर मध्ये 14 तारखेला आरोग्य मेळावा दिनी “उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, आभा आयडी तयार करणे आणि टेली कन्सल्टेशन सेवा उपलब्ध करून देणे” या विषयावर जनजाग्रुती करण्यात आली. जानेवारी महिन्यात 14 तारखेला आरोग्य मेळावा दिनी “किशोरवयीन वयोगटाकरिता विशिष्ट आरोग्य उपक्रम आणि कुष्ठरोग निर्मूलन उपक्रम राबविणे” या विषयावर जनजाग्रुती करण्यात आली.14  फेब्रुवारी रोजी सायकर रॅलीचे नियोजन करून “आरोग्य करिता सायकल” या थीम द्वारे आरोग्य विषयक संदेशाची जनजागृती करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचार्या मार्फत आरोग्य करिता सायकल चे महत्व लोकांना पटवुन जनजागृती करण्यात येणार आहे. सायकलचे मानवी शरीराला जे काही फायदे होतात याबाबत लोकांना जागृती करण्यासाठी मदत होणार आहे असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन वानखेडे ह्यांनी ह्या प्रसंगी दिली आहे.
सायकल चालवण्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल होतो. आपले वजन नियंत्रित राहते. सायकल चालवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मसल्स मांस पेशी, स्नायू क्रियाशील राहतात. त्यामुळे आपण फिट आणि फाईन राहतो. सायकल मुळे कार्डिओ व्हॅस्क्युलर क्षमताही वाढते. हाडे मजबूत राहतात. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग अशा जीवनशैली बद्दल आजारापासूनही बचाव होतो. वजन घटवण्यापासून ते गंभीर आजारांना सामना करेपर्यंत सायकल चालवणे फायदेशीर ठरते.
दररोज सायकल चालवण्याचा व्यायाम केल्याने शरीराच्या मांस पेशी, सांधे आणि हाडे मजबूत होतात. वजन आटोक्यात राहते. शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर, पक्षाघात, डायबिटीस अशा गंभीर आजारापासून दूर राहण्यास मदत होते. तसेच यामुळे मानसिक आरोग्य देखील चांगले राहते असे आरोग्यासाठी अनेक उपयुक्त फायदे सायकल चालवण्यामुळे होतात. फक्त अर्धा ते एक तास सायकलिंगमुळे तुम्हाला संपूर्ण वर्कआउट चा फायदा मिळतो. एक तासाच्या सायकलच्या व्यायामामुळे 500 ते 800 कॅलरीज कमी करता येते. आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.नियमित सायकल चालवण्यामुळे हृदय आणि फुफ्फुस यांचे आरोग्य चांगले राहते. शरीरातील रक्त संचारण व्यवस्थित होते. हृदयाच्या मांस पेशींची ताकद वाढते. रक्तातील चरबीचे प्रमाणही कमी होते. एचडीएल या वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. मन उदास होणे , ताण-तणाव, चिडचिडेपणा येणे हे सर्व कमी होते.
सामाजिक व राष्ट्रीय फायदे खालील प्रमाणे-
1) सायकल मुळे व्यायाम होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. हार्ट अटॅक, मधुमेह, लठ्ठपणा ,पक्षघात
यासारखे आजार कमी होण्यास मदत होते. पर्यायाने नियोगी राष्ट्र निर्माण होण्यास मदत होते.
2) सायकल चालवणे सोपे असते. सायकलिंग मुळे पार्किंग समस्या होत नाहीत. वाहतुकीची कोंडी होत नाही.
जीवघेणे अपघातही होत नाहीत.
3) सायकल खरेदी करण्याचा आणि देखभालीचाही खर्च हा इतर वाहनांच्या तुलनेत अत्यल्प असतो.
4) सायकलिंग मुळे पेट्रोल- डिझेल यासारख्या इंधनाची गरज नसते. त्यामुळे इंधनाची मागणी कमी होऊन आखाती
देशात जाणारा इंधनासाठी जाणारा राष्ट्रीय पैसा वाचण्यास मदत होतो.
5) सायकल चालवण्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. इंधन लागत नसल्यामुळे हवेचे प्रदूषणही होत नाही ,ध्वनी
प्रदूषणही कमी होते.