कालीमाती प्रतापगड येथे 17 फेब्रुवारीला भव्य खंजिरी भजन स्पर्धा

0
14

 18 फेब्रुवारीला महाप्रसादाचे आयोजन 
अर्जुनी मोर. :– गणेश सत्संग मंडळ कवठा, कोकणाई माता मंडळ कवठा ,कालीमाती हनुमान देवस्थान समिती ,ग्रामपंचायत सुकळी ,प्रतापगड गोठणगाव, बाराभाटी ,कुंभीटोला, कवठा, डोंगरगाव, देवलगाव, मोरगाव, निलज, एरंडी ,देवलगाव यांचे संयुक्त विद्यमाने तीर्थक्षेत्र प्रतापगड महाशिवरात्री यात्रेचे औचित्य साधून हनुमान मंदिर परिसर कालीमाती येथे 17 फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजेपासून भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 18 फेब्रुवारीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
. पुरुष व महिला अशा दोन्ही गटासाठी ही भजन स्पर्धा आयोजित असून पुरुष गटासाठी प्रथम बक्षीस दहा हजार, द्वितीय 7 हजार, तृतीय 5 हजार, चतुर्थ 3 हजार, व पाचवे बक्षीस दोन हजार तर महिला गटासाठी प्रथम बक्षीस 5 हजार, द्वितीय 4 हजार, तृतीय 3 हजार तर चतुर्थ बक्षीस दोन हजाराचे ठेवण्यात आले आहे. तसेच प्रोत्साहन पर बक्षीस ही देण्यात येणार आहे .या स्पर्धेचे औचित्य साधून केवळराम कांबळे पुजारी तथा हरिश्चंद्र मेश्राम यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते होईल, सह उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर तर अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती उपसभापती होमराज पुस्तोडे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील तरोणे, जिल्हा परिषद सदस्य कविता कापगते ,माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे ,सभापती सविता कोडापे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल. या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आव्हान आयोजका तर्फे करण्यात आले आहे.