शिवमुर्ती व मोक्षधाम प्रवेशव्दाराचे लोकार्पण;सेजगाव येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

0
15

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे मोक्षधाम समितीच्या वतीने प्राणप्रतिष्ठा समारोह तसेच कलशयात्रा ग्रामदेवता पुजन कार्यक्रम १४ व १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. दरम्यान जि.प.सभापती संजयसिंह टेंभरे, धनवर्षा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश कटरे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम कटरे, सरपंच उषा कठाणे, जि.प.सदस्य पवन पटले, पं.स.सदस्य ज्योती शरणागत, उपसरपंच टेकचंद बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत सेजगाव येथील मोक्षधाम परिसरात मोक्षधाम प्रवेशव्दार तसेच शिवमुर्तीचे लोकार्पण करण्यात आले.
सेजगाव येथे लोक सहभागातून मोक्षधाम परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, गावातील भुवन पारधी यांनी यासाठी पुढाकार घेवून व गावातील लोकांना हाताशी घेवून कार्याचा विडा उचलला आहे. गावातील नागरिकांसह गावातील बाहेर राहणारे नागरिकांकडून तसेच परिसरातील दानदात्याकडून लोकवर्गणी घेवून या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे काम मागील ३ वर्षापासून सुरू आहे. त्यातच स्थानिक मोक्षधाम समितीच्या वतीने मोक्षधाम परिसरात नवे प्रवेशव्दार तसेच शिवमुर्ती स्थापित करण्यात आली. त्यासाठी १४ व १५ फेब्रुवारी रोजी प्राणप्रतिष्ठा समारोह व कलश यात्रा, ग्रामदेवता पुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी प.स.उपसभापती डॉ.किशोर पारधी, डॉ.वसंत भगत, टोलीराम गौतम, चंद्रकांत बिसेन, प्रेमलाल टेंभरे, टेकचंद पारधी, बाळुभाऊ भगत, बंडू टेंभरे, ग्रा.पं.सदस्य तिर्थराज पारधी, भैय्यालाल बिसेन, किसनलाल बिसेन, खुशरंग सोनवाने, गौरीशंकर पारधी, सुरेश पारधी, हंसाताई बावणकर, ज्योती भालाधरे, गिता उके, प्रियंका राऊत, संगीता बिसेन, निलेश्वरी पारधी, पुस्तकला पटले, कन्हैया सिहमारे, जितेंद्र बिसेन, लोकचंद रहांगडाले, तिलकचंद पारधी यासह मोठ्या संख्येने गनमान्य नागरिक व गावकरी उपस्थित होते.