शिवाजी महाराजांचा अपमान आंबेडकरी जनता खपवून घेणार नाही–अध्यक्ष नानाजी शेंडे यांचा इशारा

0
10

393 वी जयंती उत्साहात

गोंदिया ता.20:-देशातील प्रस्थापित समाजव्यवस्था ही विखारी लिखाण करून कदाचित “अफजल खान हा शिवाजीचा मामा होता “असे सांगण्याचा प्रयत्न करेल,अशी भिती 100 वर्षांपूर्वी सण 1922 मध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी वर्तविली होती,आणि घडलेही तसेच जेम्स लेन या लेखकाने असेच अपमानकारक लिखाण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. जर असेच चालू राहील तर आंबेडकरी जनता महापुरुषांचा अपमान खपवून घेणार नाही असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंतीचे अध्यक्ष नानाजी शेंडे यांनी दिला. कुंभारे नगर येथील बुद्ध विहारात आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंती कार्यक्रमात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते.
श्री शेंडे पुढे म्हणाले की, छत्रपतीनी स्वबळावर आपले राज्य निर्माण केले. ते आमचे आदर्श आहेत, परंतु याच आदर्श छत्रपतींचा राज्यभिषेक साकारताना तत्कालीन विषमतावादी समाजव्यवस्थेने राजांचा अपमान केला, यावर त्यांनी आगपाखड केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी महाराजांना विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थिताना मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पृथ्वीराज कोल्हटकर यांनी तर आभार श्रीमती सविताताई उके यांनी केले.