बौद्ध सामुहिक विवाह समारोह समितीच्या अध्यक्षपदी घनश्याम पानतवणे यांची निवड़

0
32

गोंदिया,-विवाह सोहळा साजरा करण्यासाठी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे, आर्थीक परिस्थिती बरोबर नसल्या कारणाने विवाह टाळणे,पैशाची जुड़वा-जुड़व करताना वेळ निघुण जाने व हे सर्व करत असताना होणारा त्रास,मानसिक संताप अशे प्रकार टाळण्यासाठी सामुहिक विवाह हे सर्वोत्तम माध्यम आहे. हे ऊद्दीष्ट समोर ठेवुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे विश्वभुषण, भारतरत्न ,परम पुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती ट्रस्ट (रजि.) व भिमघाट स्मारक समितीचे संयुक्त विद्यमाने अमित भालेराव यांचे अध्यक्षतेत व भीमघाट स्मारक समितीचे अध्यक्ष श्याम चौरे,गोंदिया नगर परिषदेचे माजी सभापति घनश्याम पानतवणे तसेच लुंबीणी युनिवर्सल ऑर्गनायजेशनचे प्रविण बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेत प्रामुख्याने विलास राऊत, रविकांत कोटांगले, अनिल डोंगरे, शैलेश टेभेंकर, बसंत गणवीर, कॉम्रेड मिलिंद गणवीर,प्रफुल्ल भालेराव,अमर राहुल सुनिल मेश्राम ,रवि भालाधरे ,जितेंद्र सतिसेवक, किशोर मेश्राम, कपिल नागदेवे व वेदांत गजभिए ईत्यादि कार्यकर्ते हजर होते या सभेत “बौद्ध सामुहिक विवाह समारोह समिती”ची स्थापना करण्यात आली असुन समितीचे अध्यक्षपदी ‘नगर परिषदेचे माजी सभापति घनश्याम पानतवणे यांची एकमताने निवड़ करण्यात आली. सामुहिक विवाह सभारंभाचे आयोजन 1 मे 2023 ला सायंकाळी 6 वाजता डॉ.बाबासाहेब सांस्कृतिक भवन मरारटोली गोंदिया येथे आयोजित करण्यात येईल. हे उपक्रम यशस्वी करण्याकरिता या सामुहिक विवाह समारंभात विवाह करणाऱ्यांनी त्वरित आपल्या नावाची नोंदणी करावी, हि विंनती समितीने केली आहे.