जि.प. सोनी क्षेत्रात ७ कोटी ६१ लाख रुपयांच्या विविध विकास कार्याचे भूमिपूजन

0
24

निःशुल्क रोग निदान व उपचार शिबिर संपन्न

मानवसेवा हीच ईश्वर सेवेचा मंत्र जोपासा : जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले

गोरेगाव : भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद क्षेत्र सोनीच्या वतीने निःशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन दिनांक १२ मार्च रोजी नरसिंह प्राथमिक शाळा, सोनी येथे करण्यात आले होते. ज्यात हृदयरोग, किडनीरोग, मधुमेह, ब्रेन आणि स्पाईन सर्जरी, ब्रेन संबंधी रोग, सर्व प्रकारच्या आपतकालीन सर्जरी, हाडे संबंधी रोग, दमा, टी.बी., श्वास संबंधी आजार, पोटाचे आजार, रक्त दोष, प्रसूती संबंधी उपचार, नाक, कान, गळा संबंधी आजार, घेंगा रोग अशा विविध आजारांचे निदान व उपचार केले गेले. क्षेत्रातील अनेक नागरिकांनी यांचा लाभ घेत कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांचे आभार मानले. दरम्यान मानवसेवा हीच ईश्वर सेवेचा मंत्र जोपासण्याचे आवाहन पंकज रहांगडाले यांनी केले. दरम्यान कार्यक्रमात अध्यक्षस्थानी गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले तर कार्यक्रमाचे दिपप्रज्वलक म्हणून हेमंत पटले प्रदेश उपाध्यक्ष भाजप व गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार खोमेश रहांगडाले उपस्थित होते.

विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
सोनी जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत ७ कोटी ६१ लाख रुपयांच्या विविध विकास कार्याचे भूमिपूजन गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनीलजी मेंढे तसेच गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले. यात ग्रामपंचायत सोनी अंतर्गत पाणी पुरवठा नळ जोडणी, आंगणवाडी, घनकचरा व्यवस्थापन, शौचालय, बैटरी रिक्शा, आरोप्लांट, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती व आरोग्य उप केंद्र दुरुस्ती ची कामे केली जातील. ग्रामपंचायत तुमखेडा अंतर्गत आन धान्य साठवण गोदाम बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती व नाली बांधकाम, सिमेंट रस्ता, रस्त्याचे खडीकरण, पूल बांधकाम, बैटरी रिक्शा ची कामे करण्यात येतील. ग्रामपंचायत हिरडामाली अंतर्गत आंगणवाडी, प्राथमिक उपकेंद्र दुरुस्ती ची कामे करण्यात येतील. ग्रामपंचायत बोटे अंतर्गत पाणी पुरवठा व नळ जोडणी, सौर उर्जा प्रकल्प, सभामंडप ची कामे करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत झांझीया अंतर्गत पाणी पुरवठा व नळ जोडणीची कामे करण्यात येतील. ग्रामपंचायत मोहगाव (बू.) अंतर्गत आरो प्लांट, पाणीपुरवठा व नळजोडणी, व प्राथमिक उपकेंद्र दुरुस्तीची कामे केली जातील. ग्रामपंचायत दवडीपार अंतर्गत पाणी पुरवठा व नळजोडणी, जि.प. शाळा येथे शौचालय, सिमेंट रस्ता, व जि.प. शाळा येथे आरो प्लांट ची कामे करण्यात येणार आहेत.

जि.प. सोनी येथे भारतीय जनता पक्षाच्या शाखेचे उद्घाटन व फलक अनावरण
भारतीय जनता पार्टी कार्यालय शाखा – सोनी चे उदघाटन गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. सुनिलजी मेंढे यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान सुनील मेंढे यांनी शाखेच्या समस्त पदाधिकारी आणि सदस्यांना शुभेच्छा देत पक्षाच्या भूमिकेशी अनुरूप कार्य करण्याच्या सूचना केल्या तसेच येत्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे व भारतीय जनता पक्षाचे कार्य घरोघरी पोचविण्याचे आवाहन केले.

दरम्यान गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनीलजी मेंढे, गोरेगाव – तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले, जि.प. सदस्य संजय टेंभरे, जि.प. सदस्य रुपेश (सोनू) कुथे, माजी आमदार खोमेश रहांगडाले, जि.प. सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, पं.स. सभापती मनोज बोपचे, भाजप तालुका अध्यक्ष साहेबलाल कटरे, तालुका महामंत्री गिरधारी बघेले, पं.स. सदस्य किशोर पारधी, जि.प. सदस्य प्रितीताई कतलाम, पं.स. सदस्य चित्रलेखाताई चौधरी, सरपंच सोनी हेमेश्वरीताई रहांगडाले, माजी जि. प. सदस्य राणीताई रहांगडाले, कृ.उ.बा. स. माजी उपसभापती व्यंकटभाऊ कटरे आणि मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्ष सोनी जिल्हा परिषद चे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.