प्रभाग क्र. १०  मधील ३ कोटी २३ लाख निधीच्या मंजूर कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

0
13

गोंदिया-गोंदिया शहरातील प्रभाग क्र.१० येथील आ.विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने मंजूर ३ कोटी २३ लक्ष च्या विकासकामांचे भुमिपुजन व लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रामुख्याने आ.विनोद अग्रवाल हे उपस्थित होते. तसेच त्यांनी आपले विचार मांडतानी सांगितले की, माझे नेहमी प्रयत्न संधी चे सोन कसे करता येईल यावर लक्ष असते. व या निर्धाराने शहरातील विकास कसा करता येईल यावर मागील ३ वर्षापासून कार्य करीत आहे. तसेच शहराकरीता ५५कोटी ची निधी मंजूर करण्यात येईल. गोंदिया शहरामध्ये अनेक मध्यमवर्गीय कुटुंब आहेत त्यांना पिण्याचे पाणीची योग्य सोय नसल्याने फार त्रास सहन करावे लागत असते त्या करीता २७० कोटी चे DPR शासनाला मंजूर करण्यात आले आहे. नेहमी मी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे आहे त्यांच्या कोणतीही अडचणी असतील तर त्यानी माझ्याकड़े ठेवावे व यावर तोडगा काढण्याचे कार्य माझे आहे. शिक्षणासंबधी तसेच आरोग्यविषयी समस्या असल्यास माझ्याशी संपर्क साधावे असे त्यांनी वक्तव्य या प्रसंगी दिले.जनतेची पार्टी चाबी संगठन चे शहर अध्यक्ष यांनी म्हणाले की, गेल्या २७ वर्षांपासून गोंदियात एकच नारा देण्यात आले “तन से करेंगे मन से करेंगे, गोंदिया को नंबर वन करेंगे पण ते कधी करणार” असे बोलले.तसेच म्हणाले की आमदार साहेबांना भुमिपुजन करण्यासंबधी कोणतीही उमंग व रस राहत नाही.मोठ्या आग्रहानंतर ते भुमिपुजनाच्या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी तयार झाले असे सांगितले.ज्यावेळी आमदारांना प्रभागातील कामांची मागणी केली, तेव्हा त्यांनी निधी उपलब्ध करून दिला व प्रभागात अनेक विकास घडवून आणले.त्या बद्दल संपूर्ण प्रभागवासियांचा तर्फे आमदार साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करीत आहोत अश्या प्रकारे आभार मानले.कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने आ.विनोद अग्रवाल, जनता की पार्टी चे अध्यक्ष भाउरावजी उके, शहर अध्यक्ष कशिश जायसवाल, पूर्व नगर उपाध्यक्ष शिव शर्मा, विवेक मिश्रा माजी सभापती, दीपक बोबडे नगरसेवक, प्रभाग क्र.१०, धर्मेन्द्र डोहरे, राम पुरोहित, संदीप तुरकर, मोन्या नागदवने, पंकज सोनवाने, इत्यादी कार्यकर्त्ता तसेच नगरवासी प्रामुख्याने उपस्थित होते.