गोंदियात 18 मार्चला युवा उत्सवाचे आयोजन

0
15

 गोंदिया, दि.15 : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरु युवा केंद्र गोंदियाच्या वतीने 18 मार्च 2023 रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय गोंदिया येथे युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कविता लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, समुह लोकनृत्य, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये 15 ते 29 वयोगटाचे युवक-युवती सहभाग घेऊ शकतात.

          कविता लेखन स्पर्धेमध्ये नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना हा विषय आहे व याचे प्रथम पारितोषिक 1 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 750 रुपये व तिसरे पारितोषिक 500 रुपये आहे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक      5 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 2 हजार रुपये व तिसरे पारितोषिक 1 हजार रुपये असून नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना हा विषय आहे. समुह लोकनृत्य स्पर्धा प्रथम पारितोषिक 5 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 2 हजार 500 रुपये व तिसरे पारितोषिक 1 हजार 250 रुपये असणार आहे. मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेकरीता विषय हा स्पर्धेस्थळी देण्यात येणार आहे. यासाठी प्रथम पारितोषिक 1 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 750 रुपये व तिसरे पारितोषिक 500 रुपये आहे. चित्रकला स्पर्धेसाठी नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना हा विषय ठेवण्यात आला आहे व यासाठी प्रथम पारितोषिक 1 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 750 रुपये व तिसरे पारितोषिक 500 रुपये असणार आहे.

          युवा उत्सव निमीत्ताने होत असलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता नाव नोंदणी करण्यासाठी नेहरु युवा केंद्र कार्यालय गोंदिया, कापसे बिल्डिंग, सिव्हील लाईन्स, गोंदिया येथे प्रत्यक्ष अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 8459172275/ 9545154102 यावर संपर्क साधावा. असे नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी श्रृती डोंगरे यांनी कळविले आहे.